शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सावदा येथे हॉटेलमध्ये वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:31 IST

सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहॉटेल मालकासह चालकाविरुद्धही गुन्हाफैजपुरातही रहिवाशाला वीज चोरी करताना पकडलेवीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाची कारवाईयावल पोलीस ठाण्यात गुन्हा

यावल, जि.जळगाव : सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. यामुळे खळबळ उडाली आहे.सूत्रांनुसार, सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये विद्युत उपकरणासाठी अधिकृत वीजपुरवठा न घेता, विनापरवानगीने विजेचा वापर करण्यात येत असल्याचे भरारी पथकाच्या अचानक तपासणीत आढळले. दोन महिन्यांपासून विजेचा अनधिकृतपणे वापर करण्यात येत होता. यामुळे ८७० युनिटचा वापर करून हॉटेल व्यवस्थापनाने १३ हजार ६४१ रुपयांची वीज चोरी केली. यावरून या हॉटेलचे मालक सुभाष रामभाऊ चौधरी आणि ही हॉटेल चालविण्यासाठी घेतलेले रामभाऊ कडू महाजन यांच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय फैजपूर येथील मिन्नत नगरातही तपासणीत घरगुती वापरासाठी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. तन्वीरखान अजमलखान यांनी ११ एप्रिल २०१७ ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत घरगुती विद्युत उपकरणासाठी तीन हजार ७६१ युनिटचा बेकायदा वापर केला. यानुसार ५८ हजार ७९६ रुपये किमतीच्या विजेची चोरी केली. म्हणून तन्वीरखान अमजलखान यांच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच.वाय. ठोसरे यांनी ही फिर्याद दिली आहे. सावदा येथील हॉटेलमधील वीज चोरीचा गुन्हा सावदा पोलिसांकडे, तर फैजपूर येथील वीज चोरीचा गुन्हा फैजपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणYawalयावल