पारोळा : लोणी, ता.पारोळा येथील शेतकरी युवराज उखा भिल (रा.लोणी) यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी मुरलीधर पिरण पाटील रा.लोणी यांची बैल जोडी गेली होती. शेतातून विद्युत तार गेली असल्याने पावसामुळे लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरला. पेरणी करत असताना एका बैलाचा त्या खांबाला स्पर्श झाला. शॉक लागून ४० हजार किमतीचा बैल जागीच ठार झाला. ही घटना ७ दुलै रोजी दुपारी १२.०० वाजता घडली. घटनास्थळी पोलिसांनी तसेच तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला.
विजेचा शॉक लागून बैल दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:14 IST