शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

राज्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 16:04 IST

सहकार विभागाचे निवडणूक प्राधिकरणाला पत्र : भुसावळ आणि बोदवडचा ही समावेश

मतीन शेख, मुक्ताईनगर, जि. जळगाव : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण आणि विभाजनाच्या मुद्यावर राज्यातील बोदवड आणि भुसावळसह सात बाजार समितीच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला गुरुवारी पत्र पाठवले आहे.

बोदवड येथील बाजार समिती निवडणूक स्थगित होणार आहे. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणारे वरणगाव उप बाजाराचे भुसावळ बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ बाजार समितीची निवडणूक ही स्थगित होईल. याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, लासूर स्टेशन, नांदेड जिह्यातील कुंटूर, आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील बाजार समित्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. तर कारंजा (घा.) येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे येथील निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे.

राज्यात बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. अशातच राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने विलीनीकरण आणि विभाजनाच्या कारणास्तव बोदवड येथील बाजार समितीसह राज्यातील अन्य सात बाजार समितीच्या निवडणुका स्थगित करण्याचे पत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांना ६ एप्रिल रोजी पाठवले आहे.

पत्राच्या अनुषंगाने खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन (जि. छत्रपती संभाजीनगर) बाजार समितीत विलीनीकरण, कुंटूर ता. नायगाव (जि. नांदेड) बाजार समितीचे नायगाव (बा.) बाजार समितीत विलीनीकरण, आष्टी, जि. वर्धा येथील बाजार समितीचे विभाजन करुन कारंजा (घा.) येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे वरील बाजार समितीच्या निवडणुका स्थगित करण्यात याव्यात. त्यांचे विभाजन आणि विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणास या पत्राद्वारे सुचविण्यात आले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Electionनिवडणूक