शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

यावलला उपोषणादरम्यान वृद्धाचा मृत्यू

By admin | Updated: February 24, 2016 00:53 IST

पालिका कार्यालयासमोरील घटना : अतिक्रमण काढण्याच्या आश्वासनानंतर हलवला मृतदेह

 यावल : अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी 80 वर्षीय वृद्धासह एक कुटुंब मंगळवारी पालिकेसमोर उपोषणाला बसले असताना या कुटुंबातील देविदास रामचंद्र भारंबे या वृद्धाचा दुपारी दीड वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ या प्रकारामुळे नातेवाईक संतप्त झाले होते. परिणामी पालिका प्रशासनाने नमते घेत 9 मार्चर्पयत अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सायंकाळी पाच वाजता मृतदेह हलविण्यात आला़

आठ वर्षापासून लढा

शहरातील न्यायालय रस्त्यावर देविदास भारंबे यांचे दुकान व निवासस्थानही आह़े शेजारचे अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी 2008 पासून पालिकेडे पाठपुरावा लावला होता़ नुकत्याच राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतही त्यांच्या तक्रारींची दखल न घेतली गेल्याने त्यांनी दुजाभाव झाल्याचा आरोप करीत ते कुटुंबासह मंगळवारी सकाळी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणाला बसले होत़े

तक्रारींना टोपली, पाणी अडवले

न्यायालय रस्त्यावरील भारंबे यांच्या दुकान व निवासस्थानालगतच सीटी सव्र्हे नं. 189 मधील रहिवासी प्रभाकर सोनार यांनी 2008 मध्ये गटारीवर अतिक्रमण करीत दुकानाचे दरवाजे बसवून गटार अडविल्याने भारंबे यांच्या घरातील सांडपाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे हे अतिक्रमण पालिकेने काढावे यासाठी देविदास भारंबे यांनी 17 मार्च व 26 डिसेंबर 2008, 21 जानेवारी व 2 फेब्रुवारी 2016 रोजी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र अतिक्रमण हटविण्यात आले नाही़

मोहिमेतही दिला खो

काही दिवसांपूर्वी पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतही हे अतिक्रमण काढण्यात आले नाही शिवाय लगतच असलेल्या कासमअली बोहरी यांचे व सीटी सव्र्हे नं. 185 मधील काशिनाथ बारी यांचा ओटा व बाहेर आलेले पत्रे काढण्यात आले नाही.

उपोषणाचा दिला होता इशारा

अतिक्रमण काढावे यासाठी भारंबे यांचा मुलगा पुरूषोत्तम भारंबे यांनी पालिकेस 18 फेब्रुवारी रोजी पत्रान्वये 23 फेब्रुवारी पासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. तरी देखील पालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे देविदास भारंबे, शालिनी भारंबे, मुलगा पुरूषोत्तम , सुन धनश्री हे मंगळवारी सकाळी पालिकेसमोर उपोषणास बसले होत़े त्यात दुपारी दीडच्या सुमारास देविदास भारंबे यांचे निधन झाल़े

प्रशासनाची धावपळ

भारंबे यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलीस निरीक्षक सतीश वाघ, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरीक घटनास्थळी जमा झाले.

अकस्मात मृत्यूची नोंद

भारंबे यांच्या मृत्यूप्रकरणी पुरूषोत्तम भारंबे यांच्या खबरीनुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ ग्रामीण रुग्णालयात डॉ. कौस्तुभ तळेले यांनी शवविच्छेदन केल़े

 

इन्फो..

कारवाईच्या आश्वासनानंतर हलवला मृतदेह

प्रभारी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून सरकारी रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण असल्यास ते 9 मार्चर्पयत हटविण्याचे लेखी आश्वासन भारंबे कुटुंबियांना दिल्यानंतर मृत देविदास भारंबे यांचा मृतदेह पालिकेसमोरून हलविण्यात आला़

पदभार स्वीकारताच घटना

यावल पालिकेचे मुख्याधिकारी आढाव हे दीर्घ रजेवर असल्याने प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार अमोल बागुल यांनी मंगळवारीच स्वीकारला़ त्यानंतर अवघ्या काही तासाच ही घटना घडली़

 

कोट..

भारंबे यांच्या तक्रार अर्जाचा मी पूर्वीपासूनच पाठपुरावा करीत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्त्याच्या मोजणीनंतर कारवाई करू यासाठी वेळ लागेल, असे सांगण्यासाठी तसेच त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी सोमवारी पालिकेचे अभियंता शेख यांना भारंबे यांच्याकडे पाठवले होते मात्र भारंबे सकाळी उपोषणास बसले असतानाच घडलेली घटना दुर्दैवी आहे. विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत.

-अतुल पाटील, नगराध्यक्ष

भूमी अभिलेख विभागाकडून तातडीने शासकीय रस्त्याचे मोजमाप केले जाईल. तातडीच्या मोजमापनासाठी सात दिवसाचा कालावधी लागतो. भारंबे यांच्या घरालगतचे अतिक्रमण असल्यास तातडीने काढण्यात येईल़ घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आह़े

-अमोल बागुल, मुख्याधिकारी