शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृध्द पती-पत्नीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:05 IST

वयोवृध्द पती-पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना ९ सप्टेंबर मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देचोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी केलेले कृत्य असावेघटनास्थळी श्वान तसेच फॉरेन्सिक लॅब दाखल

सावखेडा/फैजपूर, जि.जळगाव : रोझोदा, ता.रावेर येथे वयोवृध्द पती-पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना ९ सप्टेंबर मध्यरात्री घडली. ओंकार पांडुरंग भारंबे (वय ९०) आणि सुमनबाई ओंकार भारंबे (वय ८४) अशी मयतांची नावे आहेत. यातील ओंकार भारंबे हे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी होते. घटनेचे निश्चित कारण समजले नसले तरी चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सूत्रांनुसार, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे यांच्या घराच्या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. यामुळे हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्यसेवक हारुन काझी हे या परिसरात गुरुवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आरोग्य तपासणीसाठी गेले.घराचा दरवाजा उघडा असल्याने घरात प्रवेश केल्यानंतर ओंकार पांडुरंग भारंबे (वय ९०) आणि सुमनबाई ओंकार भारंबे हे दोघे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील वासुदेव हिवरे यांनी सावदा पोलिसांना दिली.ओंकार भारंबे यांच्या मानेवर तसेच सुमनबार्इंच्या पोटावर व मानेवरही तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दिसते.घटनास्थळी फॉरेंसिक लॅब घडलेल्या घटनेचा विचार करता चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळी श्वान मागविण्यात आले होते.जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवाय.एस.पी.गजानन राठोड, सावदा पोलीस उपनिरीक्षकद्वय राहुल वाघ व राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.मयतांच्या पश्चात सुनील व संजय ही दोन मुले असून, ते दोन्ही मुंबईला नोकरीस आहेत.भरवस्तीत घटना घडल्याने रोझोदा परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :MurderखूनRaverरावेर