शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागरी सहकारी बँकांसाठी ‘अम्ब्रेला’ स्थापण्याचे प्रयत्न: ज्योतींद्रभाई मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:55 IST

दोन दिवसीय अखिल भारतीय सहकार परिषदेस जळगावात प्रारंभ

ठळक मुद्दे नागरी बँकांचे अस्तित्व धोक्यातबँकींग क्षेत्रात मोठे फेरबदलअस्तित्वाचा लढा

जळगाव : बँकींग क्षेत्रात येऊ घातलेले मोठे बदल, बदलते तंत्रज्ञान व त्यातच उत्पन्नावर असलेले निर्बंध या आव्हानांना तोंड देणाºया नागरी सहकारी बँकांसाठी राष्टÑीय स्तरावर या बँकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना आर्थिक, तंत्रज्ञानाची मदत पुरविणारी शिखर संस्था (अम्ब्रेला) रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता यांनी दिली.जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथे जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे स्व.डॉ.अविनाश आचार्य सभागृहात गुरूवार, १८ रोजी सकाळी  सहकारी बँकांसाठी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील सहकार परिषदेचे उद्घाटन मेहता यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहकार भारतीचे संरक्षक सतीश मराठे, जनता बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, सहकार भारतीचे राष्टÑीय सचिव उदय जोशी, जनता बँकेचे माजी चेअरमन व अखिल भारतीय बँक प्रकोष्ठ प्रमुख संजय बिर्ला, जळगाव जनता बँकेचे सीईओ पुंडलिक पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालनाने परिषदेचे उद्घाटन झाले.नागरी बँकांचे अस्तित्व धोक्यातमेहता म्हणाले की, रिझर्व्ह बँक म्हणते बँकींग करा. मात्र आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात तयार झालो. बँकींगमध्ये समाजकार्य करण्यासाठीच आलो आहोत. जळगाव जनता बँक विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. मात्र नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. ते आव्हान कसे पेलू शकतो? यावर या दोन दिवसीय परिषदेत मंथन करू शकतो. जळगावात आले की सहकार भारतीचे माजीे राष्टÑीय अध्यक्ष स्व.डॉ.अविनाश आचार्य यांची आठवण होते. सहकार भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांनीही राष्टÑाला वाहून घेतले होते. त्यांचे विचार आजही सहकार भारतीच्या कार्यात मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांनी स्वयंसेवकांच्या फौजेला शिक्षण दिले. ते खरे स्वयंसेवक होऊन राष्टÑाच्या सेवेत सहभागी झाले. त्यातील एक नाव म्हणजे नरेंद्र मोदी, असेही त्यांनी सांगितले.नागरी व जिल्हा सहकारी बँकांमध्ये फरकनोटबंदीच्या घोषणेनंतर सहकारी बँकांकडील जमा नोटा स्विकारण्यास नकार देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र ही बंदी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर होती. कारण त्यात राजकारण असते. नागरी मध्यवर्ती सहकारी बँकांवर नव्हती. मात्र याची माहिती ना अधिकाºयांना आहे ना माध्यमांना. त्यामुळे नागरी सहकारी बँकांबद्दल उगीच गैरसमज होत असल्याचे मेहता यांनी सांगितले.बँकींग क्षेत्रात मोठे फेरबदलमेहता म्हणाले की, बँकींग क्षेत्रात लवकच मोठे फेरबदल होणार आहेत. फायनान्स रिसोर्स अ‍ॅण्ड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआरडीआय)बिल येत आहे. ते बँकींग क्षेत्र वेगळ्या पद्धतीने चालविण्याचे वातावरण निर्माण करेल.  त्यामुळे जो सक्षम असेल, तोच टिकेल, अशी परिस्थिती राहील. त्यासाठी राष्टÑीय नागरी सहकारी बँकांमध्ये लहान व मोठ्या दोन्ही बँकांची गरज भागवेल अशी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने राष्टÑीयस्तरावरील शिखर संस्था (अम्ब्रेला) स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अधिकाºयांना प्रस्तावही दिला आहे. युरोप-अमेरिकेतही असे अम्ब्रेला आहेत. तसा भारतात असावा, अशी मागणी आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार खाजगी बँकांसाठी करता येईल. मात्र नागरी सहकारी बँकांसाठी तशी तरतूद (रिझॉल्यूशन) नाही.  त्यामुळे सध्या खाजगी अम्ब्रेलाची तयारी ठेवली असल्याचे सांगितले. हे झाले तर त्याचा बँकांवर मोठा परिणाम होईल. त्यांना आर्थिक तसेच तांत्रिकही सहाय्य मिळू शकेल.अस्तित्वाचा लढामेहता म्हणाले की, नागरी सहकारी क्षेत्रातील लहान बँकांचा अस्तित्वाचा लढा सुरू आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कर्जरोखे, शेअर्समधून निधी उभारण्याचे पर्याय खुले असतानाही त्यांचा एनपीए ११.६ टक्के आहे. तर नागरी सहकारी बँकांचा एनपीए ६.४ तर सरासरी २.४ इतका कमी आहे. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा नागरी बँका चांगले काम करीत आहेत. मात्र त्यांना निधी उभारण्यावर बंधने आहेत. केवळ नफ्यातूनच निधी उभा करता येऊ शकतो. येत्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तरच बँकांचे अस्तित्व टिकेल. मात्र हे तंत्रज्ञान घेण्याची क्षमता या बँकांची नाही. त्यामुळे या बँकांना शिखर संस्थेची (अम्ब्रेला) गरज आहे. वेळ पडली तर लहान बँकांचे विलिनीकरणही करावे लागेल.चार ‘पी’वर भवितव्यमेहता म्हणाले की, नागरी सहकारी बँकांचे भवितव्य पॉलिसी (धोरण), प्रॉडक्ट (सेवा), प्रायसिंग (शुल्क) आणि पीपल्स (लोकांशी संबंध) या चार ‘पी’वर अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.मूल्यांशी एकनिष्ठ राहिल्यास यश निश्चितअनिल जैन म्हणाले की, त्यांच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगपती स्व.भवरलाल जैन यांनी ७ हजार रूपये भांडवलातून जैन उद्योग समुहाची सुरूवात केली. ती आज ७ हजार कोटींपर्यंत पोहोचली. वाकोदहून सुरूवात झाली. आज १२६ देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय आहे. नागरी सहकारी बँकांनीही प्रगतीची कास धरत असाच व्यवसायाचा विस्तार करावा. त्यासाठी वेगवेगळे बदलही स्विकारले लागतील. मात्र मुल्यांना धरून रहा. त्यांच्याशी तडजोड करू नका. मूल्यांशी एकनिष्ठ राहिलात तर निश्चित यशस्वी व्हाल. बँकींग क्षेत्र तसे ‘रिस्की’ आहे. या क्षेत्रात अनपेक्षीत बदल हे बहुदा नकारात्मकच असतात. त्यासाठी आधीच नियोजन केलेले महत्वाचे ठरते. जैन उद्योग समुहाने लहान शेतकºयाच्या उत्कर्ष घडवायचा मगच स्वत:चा उत्कर्ष साधायचा हेच ध्येय ठेवल्याचे सांगितले. बँका ग्राहकांना किती लाभ, सेवा देता, ते त्यांच्या व्यवसायासाठी महत्वाचे ठरेल. अनेक सहकारी बँकांमध्ये ओळखीच्या व्यक्तींना कर्ज दिले जाते. त्यामुळे पुढे अडचणी येतात. नागरी सहकारी बँकांनी स्वत:वर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. थकबाकी कमी करण्यावर भर दिला पाहिजे. एक चुकीच्या कामाचा ठपका बसला तर १०० वर्षांची चांगली सेवा निष्फळ ठरते, असे सांगितले. ते म्हणाले की, कंपनीचे ८९ देशांमध्ये प्लँट आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी जावे लागते. तेथील बँकींगशी संबंध येतो. मात्र आजपर्यंत कधी स्वत:ला बँकेत भेटायला जावे लागले नाही. बँकेतील अधिकारीच भेटायला येतात. ते मार्केटिंगचे लोक असतात. त्यांना जास्तीत जास्त कर्ज द्यायचे असते. तर त्याच वेळी तुमचे आर्थिक क्षमतेचे मूल्यमापन मात्र वेगळीच यंत्रणा करीत असते. ती समोर येत नाही. तुमचे क्रेडीट रेटींग ठरविले जाते. आयकराचे मूल्यमापनही कोणता अधिकारी करेल? हे सीएलाही माहिती नसते. अशा यंत्रणेमुळे भ्रष्टाचार होत नाही. तसेच परदेशातील बँका सर्वच क्षेत्राला एकच फॉर्म्यूलाही वापरत नाहीत. माहितीत, तंत्रज्ञानात, परिणामाने ज्ञानातही झपाट्याने बदल होत आहे. अगदी आदल्या दिवशीच्या ज्ञानात रात्रीतून बदल झालेला असतो. मात्र नैतिक मूल्य कधीही बदलत नाहीत. हीच पारंपरिक नैतिक मूल्य घेऊन आपण समाजाच्या सेवेत उतरलो तर उद्याचा नवीन भारत घडविण्यात मोलाचा हातभार लागेल. प्रास्ताविकात प्राचार्य अनिल राव यांनी या दोन दिवसीय राष्टÑीय परिषदेच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. तसेच नागरी सहकारी बँकांच्या सद्यस्थितीवरही प्रकाश टाकला. केशवस्मृती प्रतिष्ठान तसेच जळगाव जनता बँकेच्या माध्यमातून केल्या जाणाºया सामाजिक कार्याची माहितीही त्यांनी दिली.विश्वास कुलकर्णी यांनी सहकार गीत सादर केले. सूत्रसंचालन जनता बँकेचे संचालक कृष्णा कामठे यांनी केले.