शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या परिणामाने रक्तसाठ्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST

जळगाव: एकिकडे कोरोनामुळे निर्बंध लावण्‍यात आल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नसल्याने, दाते पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्‍ये रक्तटंचाई निर्माण ...

जळगाव: एकिकडे कोरोनामुळे निर्बंध लावण्‍यात आल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नसल्याने, दाते पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्‍ये रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नसल्याने सामान्यांना जेव्हा लसीकरण सुरू होईल, त्या आधी त्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या स्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून हे लसीकरण लवकर व्हावे,यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यात आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.

९५०

जणांना सरासरी रोज लस दिली जात आहे

५१०७४

जणांना आजपर्यंत लसीचा पहिला डोस देण्‍यात आला आहे.

१०

ब्लड बँक एकूण जिल्ह्यात आहेत

अजून सामान्यांना लस नाही

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. अद्याप सामान्य नागरिकांना लस दिली जात नसून साधारण महिनाभराच्या कालावधीनंतर सामान्यांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सामान्यांनी लस घेण्याआधी रक्तदान करावे, अन्यथा दोन महिने त्यांना रक्तदान करता येणार नाही.

दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान

१ शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाच्या दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी तुम्हाला रक्तदान करता येणार आहे. पहिला डोस व दुसरा डोस यात साधारण २८ दिवसांचे अंतर असल्याने लस घेतल्यानंतर दोन महिन्यांनींच तुम्हाला रक्तदान करता येणार आहे.

२ सामान्यांना जेव्हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होईल तेव्हा त्यांनी लसीकरणाआधी रक्तदान करावे, असे आवाहन करता येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राचे रक्मसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी सांगितले.

ब्लड बँक प्रमुख म्हणतात...

सध्या कॅम्प घेण्यावर निर्बंध आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या रक्तदान शिबिरांमधून पुरेसासाठा उपलब्ध झाला होता. मात्र, तो ३५ दिवस वापरता येऊ शकतो, त्यामुळे पुढील काही महिन्यात रक्तसाठ्याचा तुटवडा होऊ शकतो. दुसरीकडे अत्यावश्यक वगळून काही शस्त्रक्रिया बंद असल्याने क्ताची मागणी कमी आहे. रक्तदानासाठी मोठा कॅम्प न घेता, चार ते पाच लोक समूहाने कुठल्याही ब्लड बँकेत रक्तदान करू शकतात. सामान्यांना जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा त्यांनी लसीकरणाआधी रक्तदान करावे, कारण लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही.

- डॉ. आकाश चौधरी, रक्तसंक्रमण अधिकारी, रक्त केंद्र, जीएमसी.

सर्वच ब्लड बँकमध्‍ये सध्या साठा कमी आहे. त्यातच आता कोविडमुळे कॅम्प होत नसल्याने कलेक्शन खूपच कमी आहे. सध्‍या आपल्याकडे ८० बॅगा उपलब्ध आहेत. त्या निगेटिव्ह ग्रुप नाही. आठ दिवस पुरेल एवढा हा रक्तसाठा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण जेव्हा, सामान्यांना सुरू होईल, तेव्हा त्यांनी आधी रक्तदान केल्यास तुटवडा जाणवणार नाही. कारण कोविडच्या निर्बंधांमुळे सध्या मोठे कॅम्प घेता येत नसल्याने उन्हाळ्यात रक्तसाठ्याचा तुटवडा भासू शकतो.

- अर्जुन राठोड, गोळवलकर रक्तपेढी