शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ, भगर, शेंगदाणे वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले आहे. सोयाबीन, शेंगदाणा तेलासह सूर्यफुलाच्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेंगदाणा, भगरच्या भावात वाढ झाली, मात्र या वेळी साबुदाणा स्थिर राहिला. या सोबतच इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असून गेल्या दोन महिन्यांपासून खाद्य तेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १२० ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १३० ते १४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

महाशिवरात्रीमुळे भाववाढ

महाशिवरात्रीनंतर शेंगदाणा, भगर, साबुदाणा यांची मागणी वाढली. यात भगरचे भाव वाढून ते १०० ते ११० तर शेंगदाण्याचे भाव १२५ ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले. मात्र साबुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

पालेभाज्यांचे भाव कमी

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी यावेळी भाजीपाल्याचे भाव कमीच आहे. कोथिंबीर ३५ रुपये किलो तर मेथीही ३५ रुपये किलोवर आहे.

कांदे खाताहेत भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २५ ते ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. मात्र कांद्याचे भाव अजूनही ३० ते ४० रुपयांच्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. टमाटे १५ रुपये प्रति किलोवर असून त्यांची आवक चांगली आहे.

खाद्य तेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- संजय चौधरी, ग्राहक

खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या भावात असलेली वाढ अजूनही कायम आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या हिरव्या पालेभाज्यांचे भाव स्थिर आहे. उन्हाळा असला तरी यंदा भाव कमी असल्याचे चित्र आहे.

- गणेश पाटील, भाजीपाला विक्रेते