शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांनंतर खाद्यतेल स्वस्त; खुशाल खा चमचमीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

स्टार - ८२० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात आता घसरण ...

स्टार - ८२०

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात आता घसरण झाली असून, यामुळे गृहिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. शेंगदाणा, सोयाबीन तेलात २० रुपये प्रति किलोने घसरण झाली आहे. आता केंद्र सरकारने तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केल्याने तेलाचे भाव कमी होण्यास मदत होत आहे.

प्रत्येक घरातील तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या ‘बजेट’वर होत असतो. चार ते पाच महिन्यांपासून खाद्य तेलाच्या भावात मोठी वाढ होत गेली. एकतर अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान तसेत शेंगदाण्याची वाढलेली निर्यात यामुळे तेलाचे भाव वाढत होते.

दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना तेलाची खरेदी करणेही अवघड झाले होते. बाजारातील तेलाची मागणी पाहता केंद्र सरकारने तेल आयात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तेलाचे दर कमी झाले. सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, पाम तेल, तीळ तेल यांच्या किमती प्रति किलो १५ ते २० रुपयांनी कमी झाल्या आहेत.

आता गृहिणींना घरी पंचपक्वान्न बनविताना लागणारे अतिरिक्त तेल सहज खरेदी करता येणार आहे. पूर्वीच्या तुलनेत तेलाचे दर जास्त असले तरी अलीकडे वाढलेल्या दरापेक्षा कमी झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत तेलाची मागणी वाढली आहे.

गृहिणींचे बजेट कोलमडले

तेलाच्या किमती चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र, वर्षभराची तुलना पाहता हे भाव जास्तच आहेत. तेलाच्या वाढत्या किमतींनी गृहिणींना इतर वस्तू खरेदी करताना काहीसी कपात करावी लागली. यातून वस्तू खरेदीवर परिणाम झाला आहे. तेलाच्या खरेदीवर एकूण नियोजनापैकी ३० टक्के रक्कम खर्च होत होती. यामध्ये थोडीफार घसरण झाली आहे.

तेलबियांना मागणी असल्याने त्यांची लागवड केली जात होती. यामध्ये शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, करडई यांची लागवड होत होती. मात्र आता तेलबियांना फारशी मागणी नाही. तसेच त्याला पाहिजे तसा भावही मिळत नाही. परिणामी, तेलबियांतून तयार होणारे घाण्यातील तेल काढणेही बंद केले.

- विठ्ठल पाटील, शेतकरी

पूर्वी तेलबियांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला भाव मिळण्यासह मागणी असायची. आता पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे त्यांची लागवड होत नाही. त्यामुळे घाण्यावरून तेल काढून घेणेही बंद झाले.

- कपिल चौधरी, शेतकरी

तेलाचे भाव

तेल - पूर्वी - आता

सोयाबीन तेल - १६५ - १४५

शेंगदाणा तेल - १९० - १७०

सूर्यफूल तेल - १७५ - १६०

पाम तेल - १५० - १२८

तीळ तेल - २०० - २००