शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गेशने प्रेयसीला पाठविला होता गळफासाचा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:37 IST

प्रेमाची थट्टा केल्याने आत्महत्या : ‘ सुखी रहा’चा दिला सल्ला

ठळक मुद्देप्रेमप्रकरणातून युवकाची आत्महत्यापीएसआय बनण्याचे होते स्वप्नवडीलांची गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : असोदा येथील दुर्गेश अनिल कोळी (वय २७) या तरुणाने शुक्रवारी गळफासाने केलेली आत्महत्या ही प्रेयसीने थट्टा केल्याने आलेल्या नैराश्यातून झाली असल्याची माहिती दुर्गेशच्या कुटुंबीयांनी रविवारी पोलिसांना दिली. आत्महत्येपूर्वी दुर्गेशने प्रेयसीला गळफासाचा फोटो व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला होता. आत्महत्येस जबाबदार असलेल्या त्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून दुर्गेशचे वडील व अन्य नातेवाइकांनी रविवारी तालुका पोलीस स्टेशन गाठले. या वेळी त्यांनी दोघांमध्ये व्हॉटस्अ‍ॅपवर झालेले ‘चॅटिंग’ही पोलिसांना दाखविले.नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गेशचे शहरातील एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण होते. या तरुणीसोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती.अचानक गेल्या आठवड्यात त्या मुलीला दुसरे स्थळ आले. त्या विषयावर दोघांमध्ये चॅटिंग झाले. मी खेड्यात येऊन काय करू, तुला नोकरी नाही, उद्योग नाही, असे ती तरुणी दुर्गेशला सांगत होती. यापूर्वीही दोन ते तीन तरुणांना त्या तरुणीने असेच फसविल्याचा आरोप दुर्गेशच्या नातेवाइकांनी केला आहे.दरम्यान, प्र्रेयसीचे अन्य मुलांसोबतचे फोटो दुर्गेशच्या मोबाइलमध्ये आढळले आहे. आणखी काही पुरावे असून ते वेळप्रसंगी न्यायालयात सादर केले जातील, असे नातेवाइकांनी सांगितले. दुर्गेश याने काही दिवसांपूर्वी प्रेयसीचा वाढदिवस त्याच्या नव्या घरी साजरा केला होता.दुर्गेशचे वडील अनिल आधार कोळी, मंगलसिंग नाना सोनवणे, कैलास कोळी, विशाल सोनवणे यांच्यासह अन्य नातेवाइकांनी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांची भेट घेऊन घटनेबाबत माहिती दिली.आत्महत्या कर, पण मला फसवू नकोगुरुवारी रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करताना दुर्गेशने तिला मी आत्महत्या करतो आहे, असा मेसेज पाठविला. त्यावर तिने करायचे तर कर असे प्रत्युत्तर दिले. आता मी शेवटचा कॉल विशालला करतो, असेही त्याने म्हटले. ‘तू आयुष्यभर सुखी रहा, गुड नाईट’ असा मेसेज केला. त्यावर ‘हो। आय डोन्ट केयर’ असे म्हणत ’मला फसवू नको’ असेही त्या तरुणीने दुर्गेशला पाठविलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे.