शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाबाई मराठे व भाऊराव महाराज कदम यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:22 IST

राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानऔरंगाबाद येथे समारंभात राज्यभरातून पाच जणांची झाली निवड, त्यातील दोघे मुक्ताईनगरचे कीर्तनकार

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे.श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळा दरम्यान मुक्काम दर मुक्कामाला राजमाता जिजाऊ माता संगोपन या राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत कुपोषण मुक्तीसाठी प्रबोधनपर कीर्तने करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी राज्यातील पाच कीर्तनकारांची निवड करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर येथील नगरसेवक संतोष मराठे यांच्या पत्नी हरिभक्त पारायण दुर्गाताई मराठे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड १५ मे रोजी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या विशेष कार्यशाळे दरम्यान करण्यात आली आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ मिशनच्या सुप्रभा अग्रवाल उपस्थित होत्या.औरंगाबाद येथे राजमाता जिजाऊ माता संगोपन बालआरोग्य व पोषण मिशन या महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत राज्यातील कीर्तनकारांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. मिशनच्या सुप्रभा अग्रवाल, डॉ.सुदाम, युनिसेफचे सल्लागार अशोक उतरान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत नाशिक, जळगाव, परभणी, अकोला, औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार उपस्थित होते.श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यात कुपोषण मुक्तीवर प्रबोधनासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देशी विभागीय अध्यक्ष हभप भाऊराव महाराज पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हभप दुर्गाबाई संतोष मराठे, बºहाणपूर येथील कीर्तनकार हभप मालती महाजन महाराज, मुक्ताईनगरचे हभप भाऊराव महाराज कदम, हभप प्राध्यापक सी.एस. पाटील या कीर्तनकारांची नियुक्ती औरंगाबाद येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे करण्यात आली आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर