शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

जळगाव येथे महामार्गावर गॅस भरलेल्या टॅँकरवर आदळला भरधाव डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:16 IST

भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती’ अशीच होती.

ठळक मुद्दे अजिंठा चौकात पहाटे पाच वाजता झाला अपघातकाळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती मोठी दुर्घटना टळली 

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२ : भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती’ अशीच होती.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गॅस भरलेला टॅँकर (क्रमांक एन.एल.०१ ए.ए.२६४४) गुरुवारी पहाटे पाच वाजता इच्छादेवी चौकाकडून एमआयडीसीतील गोदामात जात असताना अजिंठा चौकात वळण घेतांना बाजार समितीकडून भरधाव वेगाने आलेला डंपर (क्र. एम.एच. १२ ई.एफ.९९५४) टॅँकरवर आदळला. गॅस पाईपची जोळणी असलेल्या ठिकाणीच डंपर धडकला. त्यात डंपरच्या दर्शनी दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने गॅस गळती झाली नाही, अन्यथा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.

या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, अतुल पाटील व अरुण राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टॅँकर सुरक्षितस्थळी हलविण्यात आला. या अपघातात डंपर चालक किरकोळ जखमी झालेला आहे.