शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे डंपरच्या धडकेत जि.प. शाळेचे केंद्रप्रमुख ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 11:54 IST

शाळेत जात असताना झाला अपघात

चाळीसगाव, जि. जळगाव : शाळेतील कवायत निरीक्षणासाठी निघालेले जि.प.मेहुणबारे बिटचे केंद्रप्रमुख लखीचंद एकनाथ कुमावत (वय ५५) हे भरधाव येणा-या डंपरच्या धडकेत जागीच ठार झाले. ही घटना धुळे - सोलापूर महामार्गावर शनिवारी सकाळी सात वाजता चाळीसगाव शहरानजीक घडली.लखीचंद कुमावत हे येथूनच जवळ असणा-या करगाव आश्रमशाळेत कवायत निरीक्षणासाठी निघाले होते. श्रीराम नगर येथे त्यांचे घर असून रस्त्याच्या बाजूला ते दुचाकीवर त्यांना घेण्यासाठी येणा-या शिक्षकाची वाट पहात उभे होते. याचवेळी धुळे कडून भरधाव वेगाने येणा-या खडीने भरलेल्या डंपरने (क्र. एम.एच.१९सीवाय ६६११) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत त्यांच्या मानेवरुन चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. चेह-याचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने बोटातील अंगठी व कपड्यांवरुन त्यांची ओळख पटली.डंपर चालक यशवंत उर्फ पिंटू विष्णू पाटील (वय ४०, रा. जुने गाव मेहुणबारे) याला घटनास्थळावरुन पळून जात असताना ताब्यात घेतले.अतिशय बोलके व मनमिळावू केंद्रप्रमुख म्हणून मयत कुमावत हे शिक्षक आणि शिक्षण विभागात परिचित होते. अपघाताचे वृत्त समजाताच त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगी असा परिवार आहे.अजितकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव