शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:42 IST

केळीला सर्वाधिक तडाखा

जळगाव : जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५०.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.गेल्या रविवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिल्याने पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, केळी, लिंबू यासह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे ७५ गावातील ४९३ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात बाधीत सुमारे २५०.६५ हेक्टरवर शेतशिवारांचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला हा अहवाल आज प्राप्त झाला असून शेतकºयांना वादळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.केळी सर्वाधिक फटकाजिल्ह्याभरात झालेल्या वादळीपावसामुळे सर्वाधिक फटका केळी ला बसला असून जिल्हाभरातील ७३ गावांमधील २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक ६३ गावांमधील १६१.४५ हेक्टरवरील केळी बाधीत झाली आहे. त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ४६ हेक्टर तर यावल तालुक्यात ०.५० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.मक्याचेही नुकसानवादळी पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र निवडणूक कामामुळे पंचनामा मागे पडले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. त्यानंतर पंचनामे सुरू झाले व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झाला. यात केळी खालोखाल २२.७ हेक्टरवरील मक्याचेही नुकसान झाले आहे. यात अधिक प्रमाण जळगाव तालुक्यात असून ८ गावातील ८५ शेतकºयांच्या १५ हेक्टरवरील मक्याला फटका बसला.या सोबतच चोपडा तालुक्यात १३ हेक्टरवरील लिंबू, याच तालुक्यात ३ हेक्टरवरील बाजरीला तसेच चोपड्यासह जामनेर तालुक्यात एकूण चार हेक्टरवरील फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.

टॅग्स :Jalgaonजळगाव