शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या अर्जांमुळे विद्यापीठात असेही घडले, सुटीच्या दिवशीही कामकाज चालले!

By अमित महाबळ | Updated: September 17, 2023 15:28 IST

इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे.

अमित महाबळ, जळगाव : शिक्षक भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांकडे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हते, त्यांची अडचण झाली होती. त्यांच्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सुटीच्या दिवशी काम करून सुमारे २५० पदवी प्रमाणपत्रांचे तातडीने वाटप केले. त्यामुळे इच्छुकांचा शिक्षक भरतीचा अडलेला मार्ग खुला झाला आहे.

राज्यात २०१७ पासून सुमारे ६० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अनेक पात्रताधारक उमेदवार नोकरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याची मुदत सुरूवातीला १५ सप्टेंबरपर्यंत होती. ती नंतर वाढवून दि. २२ सप्टेंबर करण्यात आली आहे. नोंदणी करताना उमेदवारांना गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्राच्या प्रती पोर्टलवर अपलोड करायच्या आहेत. मात्र, काही जणांकडे पदवी प्रमाणपत्राची प्रत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. या संदर्भात विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठाला निवेदन देऊन नियमानुसार शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीसाठी तातडीने पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. अर्ज करताच प्रमाणपत्रे

विद्यार्थ्यांची निकड आणि वेळेचा अभाव लक्षात घेऊन परीक्षा विभागाने शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामकाज केले आणि २५० पदवी प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. ही प्रमाणपत्रे पीडीएफ स्वरूपात आहेत. अर्ज करताच आठवडाभरात प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

टॅग्स :universityविद्यापीठ