शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या ‘अतिक्रमण हटाव’मुळे रावेर तालुक्यातील भोर ग्रामपंचायतीची झाली पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:19 IST

मध्यरेल्वेने भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे असलेले अतिक्रमण तोडून संरक्षण भिंंत बांधल्याने, भोर ग्रामपंचायत कार्यालयाचा मध्यरेल्वेच्या यार्डात दक्षिणेकडे असलेला वापर बंद होऊन पंचाईत झाली आहे. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लागून असलेल्या मंदिराच्या ओट्यावर बसून रस्त्यावर सुरू असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत कार्यालयाचे रेल्वे यार्डातील अतिक्रमण काढून रेल्वेने बांधली संरक्षण भिंतदक्षिणेकडील वापर बंद झाल्याने उत्तरेकडून ग्राम पंचायतीने वापर काढू नये म्हणून पाठीमागच्या रहिवाशांची न्यायालयात धावग्राम पंचायत म्हणते, ‘मार्ग काढू’

रावेर, जि.जळगाव : मध्यरेल्वेने भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे असलेले अतिक्रमण तोडून संरक्षण भिंंत बांधल्याने, भोर ग्रामपंचायत कार्यालयाचा मध्यरेल्वेच्या यार्डात दक्षिणेकडे असलेला वापर बंद होऊन पंचाईत झाली आहे. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लागून असलेल्या मंदिराच्या ओट्यावर बसून रस्त्यावर सुरू असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, ग्राम पंचायत कार्यालयाचा वापर उत्तरेकडून काढण्यासाठी पंचकमेटीचा खटाटोप सुरू असला तरी, उत्तरेकडे मात्र संबंधित रहिवाशांनी खासगी जागा असल्याच्या सबबीखाली स्थगिती मिळवण्यासाठी रावेर न्यायालयात धाव घेतली असून, ग्रामपंचायत कार्यालयाच्या वापराचा तंटा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने रावेर रेल्वेस्थानक परिसरातील भोर ग्रामस्थांसह दस्तुरखुद्द ग्रामपंचायत कार्यालयाने गावठाण जागेच्या पुढे जावून रेल्वे यार्डात केलेले अतिक्रमण द दिवसांपूर्वी जेसीबीव्दारे तोडून मध्यरेल्वेचे आवार मोकळे केले. मुंबई - दिल्ली लोहमार्गाच्या तिसºया व चौथ्या मार्गाच्या विस्तारीकरणासाठी अतिक्रमण हटावचा हातोडा चालला की, काही वेगळे कारण आहे? हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, रेल्वेयार्डाने अतिक्रमण हटावमुळे मात्र चांगलाच मोकळा श्वास घेतला आहे.या मध्य रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत रावेर रेल्वेस्थानक परिसराला लागून असलेल्या भोर ग्रामपंचायत कार्यालयावर जेसीबीव्दारे हातोडा चालल्याने कार्यालयाच्या प्रवेशद्वारासह सुमारे तीन फूट बांधकाम पाडण्यात आले.सदर अतिक्रमण हटवून मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांची हद्द सीमांकीत करून संरक्षण भिंत उभारली. परिणामी भोर ग्रामपंचायत कार्यालयासह लगतच्या रहिवाशांचे रेल्वे यार्डात दक्षिणेकडे असलेले दरवाजे व पयार्याने पूर्ण वापरच बंद झाला आहे. गावचा रहाटगाडा हाकणाºया ग्रामपंचायतचीच मोठी पंचाईत झाल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे.प्रस्तुत, ग्रामपंचायत कार्यालयाच्या व त्या लगतच्या रहिवाशांच्या पाठीमागे उत्तरेकडे संबंधित रहिवाशांच्या खासगी मालकीच्या जागा आहेत. सदर अतिक्रमणधारकांना उत्तरेकडून दरवाजे ठेवून वापर करण्यास उभय रहिवाशांनी हरकत घेतली आहे. रावेर न्यायालयात धाव घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.भोर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे दक्षिणेकडे अनिल व भगवान पीतांबर पवार यांची खासगी जागेत घरे असल्याने त्यांनी ग्रामपंचायतच्या उत्तरेकडून वापर काढण्याच्या कारवाईवर मनाई हुकूम मिळवण्यासाठी धाव घेतली आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या पूर्व व पश्चिमेस गावठाण जागेवर संबंधित रहिवाशांचे जुने अतिक्रमण असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाचे प्रवेशद्वार व वापर काढण्याचा वाद चांगलाच वादाच्या भोवºयात साडल्याचे विदारक चित्र आहे.भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढून रेल्वे प्रशासनाने थेट संरक्षण भिंत घालून ग्रामपंचायत व संबंधित रहिवाशांचा रेल्वेकडील वापर पूर्णपणे बंद केला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा वापर उत्तरेकडील रहिवाशांच्या एका बोळातून काढण्याचे उभय रहिवाशांनी मान्य केल्याने एक दोन दिवसात ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा काढण्यात येणार आहे.-रमेश महाजन, ग्रामसेवक, भोर ग्रामपंचायत, भोर, ता.रावेरभोर ग्रामपंचायतीचा उत्तरेकडून दरवाजा ठेवण्याचा प्रयत्न असला तरी तो उत्तरेकडून आमच्या खासगी मालकीच्या जागा असल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला उत्तरेकडून वापर काढण्यासाठी मनाई हुकूम देण्याबाबत रावेर न्यायालयात धाव घेतली असून, येत्या १९ डिसेंबर रोजी त्यासंदर्भात सुनावणी ठेवण्यात आली आहे.-भगवान पीतांबर पवार, रहिवासी भोर, ता.रावेर 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRaverरावेर