सचिन देव
जळगाव : शासनाने १५ ऑगस्ट पासून सर्वत्र अनलॉक केला आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असून, आता रक्षाबंधनामुळे तर मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जाण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे या आठवड्यात जळगावहून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असून, स्थानिक प्रवाशांना तिकीट आरक्षण मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे उभे राहुन किंवा इतर खाजगी प्रवासी वाहनांचा आधार बाहेरगावी जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही गाड्या स्थगित केल्या होत्या. त्या गाड्या आता प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यानांही प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, तिकीट आरक्षणाची सक्ती केली आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांनी गेल्या महिन्यापासून तिकीट आरक्षण करण्याला प्राधान्य दिले होते. परिणामी यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सध्या सुरू असलेल्या व मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जादा गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांमधुन केली जात आहे.
इन्फो :
५० टक्के प्रवासी संख्या वाढली
- जूनपासून शासनाने टप्प्या-टप्प्याने अनलॉक करायला सुरू असून, आता १५ ऑगस्ट सर्वत्र अनलॉक केला आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा उद्योग-व्यावसायानिमित्त पुणे-मुंबई येथे जात असल्याने, गाड्यांना गर्दी वाढली आहे.
- अनलॉकनंतर अनेक नागरिक रखडलेले लग्न समारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम करित आहेत. त्यामुळेही बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वेे गाड्यांना गर्दी दिसून येत आहे.
- गेल्या वर्षी कोरोनामुळे खाजगी प्रवासी वाहतूक व रेल्वेही बंद असल्यामुळे महिलांना रक्षाबंधनाला माहेरी जाता आले नाही. यंदा रक्षाबंधनाला मात्र अनलॉक असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने तिकीट बुकिंग करून ठेवल्यामुळे गाड्यांना गर्दी वाढली आहे.
इन्फो :
गा गाड्यांना वेटिंग