शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कारवाईच्या भीतीने जळगावात जुगा-याने घेतली इमारतीवरुन उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:33 IST

जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईपासून बचावा व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात सुनील पवार नावाचा जुगारी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देएक जुगारी गंभीर जखमी सहा जणांना पकडले११ हजाराची रोकड हस्तगत

आॅनलाईन लोकमत जळगाव दि १४, :  जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईपासून बचावा व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात सुनील पवार नावाचा जुगारी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, दुष्यंत खैरनार,अक्रम शेख, मोहसीन बिराजदार व रतन गिते यांचे पथक बुधवारी दुपारी जुन्या बसस्थानक परिसरातील इमारतीत वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्यावर धडकले. जुगाºयांमधील एका जणाने पोलिसांना ओळखले. त्याने ही माहिती जुगार खेळणा-यांना दिली. पकडले जाण्याच्या भीतीने दोन जणांनी इमारतीवरुन उडी घेतली तर सहा जण पोलिसांच्या हाती लागले. या दोघांपैकी एक जण जखमी झाला असून त्याला भास्कर मार्केट परिसरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सहा जणांना अटकजुगार खेळणा-या गणेश एकनाथ आकुल (रा.शिवाजी नगर,जळगाव), रफिक गुल मोहम्मद, शरीफ गुल मोहम्मद (रा.गेंदालाल मील, जळगाव)अनिल प्रताप नेतले (रा.कंजरवाडा,जळगाव), सचिन जयराम सपकाळे (रा.शनिपेठ,जळगाव) व सुर्यकांत वसंत शिंपी (रा.जैनाबाद, जळगाव) यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्याकडून ११ हजार ४०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.