शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीमुळे अजिंठा व्हिजिटर सेंटरचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:40 IST

३५ लाख ३५ हजार रुपये बिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने केली कारवाई

ठळक मुद्दे३५ लाख ३५ हजार रुपयांचे वीज बिल थकीतअजिंठा व्हिजीटर सेंटर आठ दिवसांपासून बंदचदेशी व विदेशी पर्यटकांमध्ये नाराजी

आॅनलाईन लोकमतवाकोद ता. जामनेर, दि.१२ : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांधलेले अजिंठा व्हिजीटर सेंटर कंत्राट दाराचे बिल थकल्यामुळे गेल्या आठ दिवसा पासून बंद करण्यात आले आहे. त्यातच महावितरण कंपनीचे ३५ लाख ३५ हजार ६३० रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे देशी विदेशी पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे .      अजिंठा विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने टी पॉईन्ट येथे अजिंठा लेणी ची अजिंठा व्हिजीटर सेंटर (अजिंठा लेणी ची प्रतीकृती)बांधली आहे. २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते याचे उद्घाटन करुन पर्यटकांना पाहन्यासाठी ते खुले केले होते. नांदेड येथील सुमाशंकर मल्टिसर्व्हीसेस या खाजगी कंपनीला देखभाल व साफसफाईचे काम दिले आहे. महामंडळाने या कंपनीने चे बिल गेल्या सहा महिन्यांपासुन दिलेच नाही. त्यामुळे ठेकेदाराने आठदिवसा पासून व्हिजीटर सेंटर पर्यटकांना पाहण्यासाठी बंद केले आहे. तसेच साफसफाई कामगारांना कामावरून बंद केले आहे.महावितरण कंपनीचे ३५ लाख ३५ हजार ६३० रुपये वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने व्हिजीटर सेंटर चा विज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पर्यटकांना लेणी बाहेर च मिळणारी लेणी ची माहिती आता मिळत नाही.

 व्हिजीटर सेंटर हे अभियांत्रिकी विभाग मुंबईच्या अंतर्गत येत असल्याने याविषयी माहिती नाही. वीज बिलसाठी अनुदान हे वरिष्ठ कार्यालयाकडून येते. ते न आल्याने वीज बिल भरता आले नाही.- अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळसहा महिन्यांपासून कंपनी स्वत: कामगारांचे पगार करत आहे. तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील करीत आहे. पर्यटन विकास महामंडळ जोपर्यंत आमचे बिल काढत नाही, तो पर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.- सुशीलकुमार जाधव ,संचालक, सुमाशंकर मल्टिसर्विसेस नांदेड.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळ