शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकनियुक्त सरपंच निवड रद्दमुळे अनेकांचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:11 IST

पुन्हा नव्याने तयारी । ग्रामीण भागात राजकारणाला नवे वळण

महिंदळे, ता.भडगाव : सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपणा?्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे ग्रामीण भागात वाहण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच निवड होणार म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली होती. परंतु लोकनियुक्त सरपंच निवड रद्द झाल्याने व सरपंच निवड सदस्यांमधून होईल हे जाहीर केल्याने लोकनियुक्त सरपंच निवडणूक लढवण्याचे अनेकांचे स्वप्न भंग झाले.आता वॉर्ड रचना आपल्या सोईनुसार कशी करता येईल यासाठी गावपुढारी तयारीला लागले आहेत. प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवड होत असल्याने उमेदवार विविध माध्यमांद्वारे समोर येत होते. परंतु या निर्णयामुळे आता नवीन रणनीती सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा भाऊबंधकीवर व आर्थिक बळावर निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. सदस्यांमधून सरपंच निवड झाल्यास ग्रामीण भागात कधीकधी पाच वर्षात पाच सरपंच होतात तर काहींना अविश्वासाला सामोरे जावे लागते.

मतदारांचा अपेक्षा भंगलोकनियुक्त सरपंच निवड होणार व निवडणूक चुरशीची होणार या उत्साहात मतदार आपापल्या परीने आपला उमेदवार लोकनियुक्त सरपंचसाठी कसा योग्य आहे हे पटवून देताना दिसत होते. परंतु सरकारच्या लोकनियुक्त सरपंच निवड रद्दच्या निर्णयामुळे मतदारांचा अपेक्षा भंग झाला.