शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाला दुष्काळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 12:54 IST

रब्बीतही जेमतेम १८ टक्के कर्जवाटप

ठळक मुद्दे२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट

जळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा जळगाव जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र घटले असून त्यामुळेच रब्बीच्या पीककर्ज वाटपावरही परिणाम झाला आहे. २५६ कोटींच्या रब्बी पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट असताना आतापर्यंत केवळ ४७५१ शेतकऱ्यांना ४६ कोटी ४ लाखांचे रब्बी पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने अपेक्षेपेक्षा फारच कमी हजेरी लावली. जेमतेम ६८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरीत २ तालुक्यातील बहुतांश मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर झाला आहे. पावसाने ताण दिल्याने खरीपाचा हंगाम हातचा गेला आहे. जी पिके तगली, त्यांच्याही उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट आली असल्याचे चित्र आहे. धरणेजलाशयांमध्ये पाणीसाठा नसल्याने तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली नसल्याने यंदा रब्बीचा हंगामही संकटात सापडला.जिल्ह्याचे रब्बीचे क्षेत्र १ लाख ५२ हजार हेक्टर आहे. रब्बीच्या पिकांची लागवड करूनही त्यांना पाणी पुरेल याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकºयांनी पेरणी न करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक शेतकºयांकडे विहिरीला पुरेसे पाणीच नसल्याने त्यांनाही रब्बीची पेरणी करता आली नाही. त्यातच जिल्हा प्रशासनानेही चारा टंचाई भासू नये यासाठी ज्या शेतकºयांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांना रब्बीच्या पिकांची लागवड न करता चाºयाची लागवड घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे यंदा जेमतेम ३५ ते ४० हजार हेक्टरपर्यंतच पेरणी होणार असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली आहे.२५६ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दीष्टयंदा रब्बी पीककर्ज वाटपाचे एकूण २५६ कोटींचे उद्दीष्ट जिल्हा बँकेसह सर्व व्यापारी बँकांना देण्यात आले होते. मात्र त्यापैकी आतापर्यंत राष्टÑीयकृत बँकांनी जेमतेम १३ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर राष्टÑीयकृत बँकांसह खाजगी व ग्रामीण बँका मिळून एकूण २३ टक्के रब्बी कर्जवाटप केले आहे. तर जिल्हा बँकेने १० टक्के पीककर्ज वाटप केले आहे. एकूण सुमारे ४६ कोटींचे रब्बी पीककर्ज वाटप झाले आहे.खरीप पीककर्ज वाटपातही आखडता हातसर्वच बँकांनी खरीप पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला होता. खरीपाचे २९४४ कोटींचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट असताना ३० सप्टेंबर अखेर मुदत संपली तोपर्यंत केवळ १७९४ कोटी म्हणजे ३५ टक्केच पीककर्जाचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती