कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे. यात व्यापारी, नोकरीसाठी ये-जा करणारे नोकरवर्ग, शिक्षणासाठी जा-ये करणारे विद्यार्थी, कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त जळगाव येथे जाणारे यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रेल्वेची गर्दी एस बसकडे वळल्याने बसेसमध्ये तासनतास नंबर लागत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. यात लहान मुले, वृद्ध व महिला यांना तर विनाप्रवास परत घरी जाण्याची वेळ येत आहे.१५ फेब्रुवारी ते ३१ मार्च या दीड महिन्यासाठी भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ, देवळाली-भुसावळ, भुसावळ-देवळाली या चारही पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. लग्नसराई, परीक्षा काळातच या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबरोबरच वेळदेखील वाया जात आहे. कारण कजगाव हे परिसरातील ४० खेड्यांचे केंद्रबिंदू आहे. ४० खेड्यातील प्रवाशांची ये-जा कजगाव येथून याच पॅसेंजरने असते. खिशाला परवडेल अशा भाड्यात आरामदायी प्रवास होतो. मात्र याच पॅसेंजर चक्क दिड महिन्यासाठी बंद केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.या गाड्या बंद झाल्याने प्रवाशांची गर्दी एसटी बसकडे वाढली आहे. परिणामी बसेस हाऊस फुल्ल चालत असल्याने बसेसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात वयस्कर महिला, पुरुष व लहान बालकांचे मोठे हाल होत आहेत. प्रवासी चढउतारमध्येही वाद होत आहेत.
पॅसेंजर रद्द केल्याने बसेसवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 15:59 IST
ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली गरिबांच्या खिशाला परवडणारी पॅसेंजर चक्क दीड महिन्यासाठी लग्नसराईत बंद केल्याने प्रवासी वर्गाचे मोठे हाल होत आहे.
पॅसेंजर रद्द केल्याने बसेसवर गर्दी
ठळक मुद्देकजगावसह परिसरातील ४० खेड्यातील नागरिकांचे हालमहिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हालप्रवासी चढउतारमध्येही वाद