शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्यामुळे औरंगाबाद महामार्गावर वाहनधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:14 IST

गेल्या वर्षभरापासून सुरु आहे काम : मार्ग बनला धोकादायक, अपघातांच्या प्रमाणात वाढ

वाकोद, ता.जामनेर :औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरु असून त्यात हा रस्ता दुतर्फा खोदुन ठेवल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर या मार्गावरील वाहतूकही अत्यंत धोकादायकही झाली आहे. याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खोदून ठेवलेल्या या रस्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहन चालविणे मोठे जिकरीचे बनले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोऱ्या बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्ता खोदून ठेवला असून वाहतुकीसाठी कच्चा रस्ता केला आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावरून दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ सुरू असते. हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असल्याने व नेहमीच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर वाहनांची गती थोडी कमी असतानाही लहान मोठ्या अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे.नेहमी या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असते. सध्या असलेल्या डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी १५ ते २० फुटांपर्यंत मुरूम व माती टाकून वाढीव रस्त्याचे काम करण्यात आले आहे.रस्त्यावर मुरुम व माती मोठ्या प्रमाणात असल्याने पाऊस असल्यास चिखल होतो व नसल्यास सतत धुळ उडत असते. यामुळे शेतातील पिके खराब होऊन शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. मात्र याचे कोणतेही सोयरे सुतक सबंधित ठेकेदाराला किंवा लोकप्रतिनिधीना नसल्याचे दिसत आहे.वाहनांची बैलगाडी पेक्षाही वाईट स्थितीगेल्या अनेक महिन्यापासून औरंगाबाद महामार्ग हा संबंधित ठेकेदार यांनी खोदून ठेवलेला आहे. मोठ मोठे खड्डे तसेच वर -खाली रस्ते यामुळे चांगल्या वाहनातही बैलगाडी पेक्षाही प्रचंड दणके वाहनधारकांना बसत आहेत. या रस्त्यावर गाडी चालवणे मोठे जिकरीचे बनले असून वाहनांचे मोठे नुकसान होत आह. यामुळे वाहन धारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर प्रवासाचा वेळही खूपच वाढत आहे. तरी एक बाजू का होईना वाहनधारकांसाठी तयार करण्यात यावी व रहदारी सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.करावा लागतोय अडचणींचा सामनाजळगाव- औरंगाबाद महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशी- विदेशी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. तसेच औरंगाबाद येथे विमानतळ, हायकोर्ट तसेच पर्यटन स्थळे असल्याने या रस्त्यावर चांगलीच वर्दळ असते.पिंपळगाव-वडगाव रस्त्याने वाढली वर्दळपहुर ते वाकोद दरम्यान रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने जळगाव -औरंगबाद प्रवास करणारे सध्या वाकोद वडगाव-पिंपळगाव मार्गे पहूर असा प्रवास करीत आहेत. शनिवार पासून सलग तीन दिवसापासून पाऊस सुरू असून सोमवार रोजी पहुर- वाकोद रस्त्यावर चिखलामध्ये गाडी अडकल्याने दुतर्फा वाहतुक खोळबंली होती. यामुळे वडगावमार्गे वाहनांची मोठी वर्दळ वाढलेली होती.