शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर प्रौढ विव्हळत असताना चालक मदत न करता पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे (वय ५७, रा. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ज्वारी घेण्यासाठी जळगाव खुर्द येथे जात असलेल्या रामा भादू शिरोळे (वय ५७, रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) यांच्या दुचाकीला भरधाव कारने दिलेल्या धडकेत शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी नशिराबादजवळील माउली पेट्रोलपंपासमोर हा अपघात झाला.

रामा शिरोळे हे रेल्वेत नोकरीला होते. गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरोळे हे भुसावळ येथून घरून ज्वारी घेण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच. १९ सी.एम. ०७९३) जळगाव खुर्द येथे येत होते. यादरम्यान नशिराबादजवळील माउली पेट्रोलपंपासमोर त्यांच्या दुचाकीला भुसावळकडे भरधाव जाणाऱ्या कारने (क्र. एम.एच. १९ बी.यू. ८९८८) जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रामा शिरोळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, हवालदार प्रवीण हाके, किरण बाविस्कर, संतोष केदार यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिरोळे यांच्याकडे असलेल्या रेल्वे विभागाच्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्यांचा मुलगा ज्ञानेश्‍वर शिरोळे यास फोनवरून संपर्क साधून प्रकार कळविण्यात आला. त्यांनी घटनास्थळ गाठून रुग्णालयात हलविले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ज्ञानेश्‍वर शिरोळे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रामा शिरोळे यांच्या पश्‍चात पत्नी वत्सला, मुलगा ज्ञानेश्‍वर, सून हर्षाली व दोन नातवंडे असा परिवार आहे.