वाकोद, जि. जळगाव, दि. 22 - गावातील जगदीश देवराम भगत या शेतक:याच्या भरवस्तीतील घरा समोरील जागेत आग लागून ठिबक सिंचनाच्या नळया, नांगर, शेती मशागतीचे अवजारे, लाकडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले. शनिवारी या ठिकाणी अचानक आग लागली. यामध्ये जवळपास 80 हजार रुपये किंमतीच्या ठिबक नळ्य़ा जळून लाकडी शेती उपयोगी अवजारेदेखील या आगीत भस्मसात झाले. नागरिकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने आग आटोक्यात आणली.
वाकोद येथे आगीमध्ये 80 हजार रुपयांच्या ठिबक नळया जळून खाक
By admin | Updated: April 22, 2017 16:37 IST