द्रौपदी नगरातून चार लाखाचा ऐवज लांबविला
घटना क्रमांक दोन :
मानराज पार्कला लागून असलेल्या द्रौपदी नगरात राजी जयप्रकाश नायर (४८) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाखाची रोकड व तीन लाखाचे दागिने असा चार लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी तीन ते रात्री साडे आठ या दरम्यान घडली. नायर हे एमआयडीसीत कंपनीत कामाला आहेत. दुपारी ड्युटीवर गेल्यानंतर घर बंद होते. सायंकाळी साडे आठ वाजता घरी आले असता घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले होते तर साहित्याची नासधून झालेली होती. कपाट व तिजोरीत ठेवलेले १ लाख रुपये, १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे डायमंड कर्णफूल, २ लाख रुपये किंमतीचे दोन मंगळसूत्र, कानातील जोड असे एकूण १० तोळे सोने चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक मगन मराठे करीत आहेत.
इन्फो
आठ मिनिटात केला हात साफ
नायर यांच्या घरात चोरी करणारा संशयित शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अवघ्या आठ मिनिटात त्याने हात साफ केला आहे. चोरट्याने घरात प्रवेश करण्याआधी दोन वेळा घराची कडी वाजविली, त्यानंतर आजुबाजुला टेहाळणी केली व काही सेंकदात दरवाजाचे कुलूप तोडून तो घरात गेला. दागिने व रोकड घेऊन अवघ्या आठ मिनिटात तो बाहेर आला व तेथून पसार झाला. चोरट्याचे उच्च राहणीमान असल्याचे कपड्यावरुन स्पष्ट होते.
घटना क्रमांक तीन :
टेलीफोन नगरात बंद घर फोडले
जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर काशीराम महाजन (वय ६५) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना टेलीफोन नगरात उघडकीला आली आहे. मधुकर महाजन यांचा मुलगा गौरव नोकरीच्या निमित्ताने पुण्याला राहतो. मधुकर महाजन हे पत्नी कल्पनाबाई यांच्यासह २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पुण्याला दवाखान्याच्या कामानिमित्त गेले. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० पुण्याहून परत आले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. ४ हजार रूपये किंमतीचा सीसीटीव्हीचा डिव्हीआर मशीन, १ हजार ५०० रूपये किंमतीचा सेटटॉप बॉक्स, १ हजार ५०० रूपये किंमतीचा राऊटर असा एकुण ७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उषा सोनवणे करीत आहे.