शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

जळगावातील बंदीस्त नाटय़गृहाच्या पूर्णत्वाचा ‘31 डिसेंबर’चा मुहूर्त टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 11:39 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानंतरही काम अपूर्णच

ठळक मुद्देरंगमंच, बैठक व्यवस्था अपूर्णचमुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटनाचा मुहूर्त टळणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31- 31 डिसेंबर्पयत बंदिस्त नाटय़गृहाचे काम पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 4 डिसेंबर रोजी दिले होते. मात्र 31 डिसेंबर उजाडले तरी येथील रंगमंच, बैठक व्यवस्था,  प्रकाश योजना आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे कामाच्या पूर्ततेचा 31 डिसेंबरचा मुहूर्त टळला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते नाटय़गृहाचे उद्घाटन करून शहरवासीयांना ही नववर्षाची भेट दिली जाईल, असे सुतोवाच पालकमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर 4 डिसेंबर रोजी पुन्हा पालकमंत्र्यांनी नाटय़गृहास भेट देऊन हे काम 31 डिसेंबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या पाश्र्वभूमीवर नाटय़गृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अद्यापही येथे 10 ते 15 टक्के काम अपूर्णच आहे. 

रंगमंचाचे काम अपूर्णनाटय़गृहाचा महत्त्वाचा भाग असलेल्या रंगमंचाचेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी शनिवार, 30 डिसेंबर रोजी पाहणी केली असता रंगमंचाच्या आजूबाजूला मागे प्लायवूड लावण्याचे काम सुरू होते. यास किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रंगमंचाचे इतर काम पूर्ण होईल. 

बैठक व्यवस्थाही नाहीबैठक व्यवस्थेसाठी खुच्र्याचेही काम पूर्ण झालेले नाही. या ठिकाणी प्लायवूड शीटवर मार्किंग करणे शनिवारी सुरू होते. हे मार्किंग झाल्यानंतर खुच्र्या तयार होतील व त्या बसविल्या जातील.

इलेक्ट्रीक फिटिंग बाकीइलेक्ट्रिक कामही अद्याप मार्गी लागलेले नाही. प्रकाश योजना, एसी यांचे काम बाकी आहे. नाटय़गृहात छतावर यासाठी जागा सोडल्याचे व उघडय़ा वायर दिसून येत आहे. या सोबतच लिफ्टचेही काम झालेले नाही. सिव्हीलवर्क व इलेक्ट्रिकल वर्क एकापाठोपाठ आहे. सिव्हीलवर्क पूर्ण होत आले असून इलेक्ट्रिक वर्क बाकी असल्याने त्यानंतरच उर्वरित सिव्हील वर्क होणार असल्याचे अधिका:यांचे म्हणणे आहे. एकूणच एवढे कामे बाकी असल्याने 31 डिसेंबर्पयत काम होत नसल्याचे चित्र असून पालकमंत्र्यांच्या आदेशाला खो दिला जात असल्याच ेबोलले जात आहे.

सिव्हीलवर्क जवळपास पूर्ण झाले असून इलेक्ट्रिक वर्क बाकी आहे. ते झाल्यानंतर उर्वरित सिव्हील वर्क होईल. इलेक्ट्रीक काम झाल्यानंतर सिव्हीलचे केवळ आठ दिवसांचे काम राहणार आहे. - प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग