शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कट प्रॅक्टीस विरोधी कायदा मसुदा समितीत चाळीसगावच्या डॉ. उज्‍जवला देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 12:49 IST

मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 11 डॉक्टरांचा समावेश

ठळक मुद्देराज्यातील एकुण 11 डॉक्टरांचा समावेशउत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून डॉ. देवरे यांची  एकमेव निवड समितीची पहिली बैठक 23 रोजी मुंबईत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22 - राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा करण्यासाठी मसुदा समिती गठीत केली असून यामध्ये चाळीसगावच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. उज्वला जयवंतराव देवरे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे  उत्तर महाराष्ट्र व मराठवाडय़ातून डॉ. देवरे या एकमेव या समितीवर आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांकडून त्यांना निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे. या समितीत ज्येष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 11 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची पहिली बैठक बुधवार, 23 रोजी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सभागृहात होणार आहे. डॉ. उज्‍जवला देवरे गेल्या 25 वर्षापासून चाळीसगाव तालुक्यात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम  करीत आहे. डॉक्टरांच्या आयएमए संघटनेतही  त्यांनी काम केले असून रोटरी व इनरव्हील क्लबसह डॉ. देवरे फाउंडेशनमार्फत अनेक सामाजिक आणि आरोग्यविषय उपक्रम त्या राबवित असतात.  कट प्रॅक्टीसमुळे वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य नष्ट होऊ पाहत असून रुग्णांच्या मन पटलावर डॉक्टरांची प्रतिमा वेगळ्या अर्थाने रंगरुप होत आहे. शासनाने याविरोधी कायदा करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आपण अभ्यासपूर्ण सूचना मसुद्यासाठी देणार असल्याचे डॉ. देवरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.