सुशोभीकरण व नूतनीकरण
चाळीसगाव : पालिकेच्या दलित सुधार योजनेत व सायली जाधव यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे नूतनीकरण व सुशोभीकरण गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. सुशोभीकरणासाठी एक कोटी १५ लाख, तर चबुतऱ्यासाठी २६ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू आहे.
गुरुवारी दुपारी तीन वाजता पुतळ्याच्या जुन्या चबुतऱ्याखाली उत्खनन सुरू असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश आढळून आला. ही माहिती पालिकेला कळविण्यात आल्यानंतर आढळलेल्या अस्थिकलशचा पंचनामा केला गेला. पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला.
चौकट
६ मे १९६१ रोजी झाले होते पुतळ्याचे अनावरण
घाट रोड लगतच्या परिसरात तितूर नदीच्या किनारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सहा मे १९६१ रोजी मध्य- भारत रेल्वे कामगार व समाज कल्याण मंडळाचे सल्लागार डी. जी. जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री सोनुसिंह पाटील होते. तत्कालीन नगराध्यक्ष रामगोपाळ दुबे, माजी नगराध्यक्ष दाजीनाना भंडारी, नगरसेवक विष्णुकुमार उपासनी, दिवाण चव्हाण, आदी उपस्थित होते.
सवाद्य मिरवणूक
पुतळा अनावरण होण्याच्या आधी शहरातून सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली होती. याबाबतची माहिती 'खान्देशातील आंबेडकर चळवळ' या ग्रंथात समाविष्ट केली आहे, अशी माहिती साहित्यिक प्रा. गौतम निकम यांनी दिली.