शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दूध संघाचे भाग भांडवल वाढविण्यासाठी वर्गणी कपात दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

जळगाव : गेल्या पाच वर्षापासून अ वर्गात असलेल्या जिल्हा दूध संघाने आता आपले भाग भांडवल वाढविण्यासाठी सभासद संस्थांची वर्गणी ...

जळगाव : गेल्या पाच वर्षापासून अ वर्गात असलेल्या जिल्हा दूध संघाने आता आपले भाग भांडवल वाढविण्यासाठी सभासद संस्थांची वर्गणी दुपटीने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संस्थेचे भाग भांडवल वाढण्यासह सभासद संस्थांना देखील लाभ होणार असल्याचे दूध संघाच्या वतीने सांगण्यात येत आहे. यासोबतच जिल्हा दूध संघाच्यावतीने चाळीसगाव येथे शीतकरण केंद्र उभारण्यासह अद्ययावत नवीन पशुखाद्य कारखाना उभारण्याविषयी चर्चा करण्यात करण्यात येऊन त्याला मंजुरी देण्यात आली.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने झाली. २०१९-२० या वर्षाची वार्षिक सभा सप्टेंबर २०२० अखेरपर्यंत घेणे आवश्यक होते. मात्र कोरोनामुळे सर्व संस्थांच्या सभा रखडल्या होत्या. मात्र आता ३१ मार्चपूर्वी सभा घेणे आवश्यक असल्याने शनिवारी ही सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी देण्यात आली.

भाग भांडवल वाढविण्यावर भर

संस्थेकडे असलेले भांडवल हे त्या संस्थेचे आत्मा असते. त्यामुळे दूध संघाने भाग भांडवल वाढविण्याच्या दृष्टीने या सभेत निर्णय घेतला. सभासद संस्थांकडून आतापर्यंत दहा पैसे प्रति लिटर याप्रमाणे कपात करण्यात येऊन वर्षअखेर त्यांना शेअर्स दिले जात होते व त्यावर लाभांश दिला जात होता. आता ही कपात दहा पैशांवरून वीस पैसे प्रति लिटर करण्यात आली असून यातून संघाचे भाग भांडवल वाढण्यासह सभासद संस्थांचीही बचत होऊन त्यांना अधिक लाभ मिळणार असल्याचे दूध संघाच्या वतीने सांगण्यात आले.

नोंदणी नावात करणार सुधारणा

जिल्हा दूध संघाची नोंदणी करताना त्याची दुध फेडरेशन अशी नोंदणी झाली आहे. आता दूध संघाचे जे नाव आहे तसे अर्थात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित असे नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

यावेळी वर्षभरातील संघाच्या व्यवसायाचा तसेच प्रगतीचा आढावा घेण्यात आला. दूध संघाच्या वतीने सभासद संस्था तसेच वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात येऊन त्यावर चर्चा करण्यात आली.

पायाभूत सुविधांसाठी उपायोजना

जिल्हा दूध संघाच्या वतीने चाळीसगाव येथे ५० हजार ते १ लाख लिटर क्षमतेचे शीतकरण केंद्र उभारण्याचा ठराव यावेळी मांडण्यात आला. त्याला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच अद्यायावत नवीन पशुखाद्य कारखाना उभारणी, लोणी व बटर साठवणुकीसाठी प्रत्येकी दोन हजार लिटर क्षमतेचे गोदाम तयार करण्यात येणार आहे. यासोबतच २० टन क्षमतेचा दूध पावडर बनवण्याचा कारखाना उभारण्यात येणार असून आईस्क्रीम व चीज प्लांट ला चालना दिली जाणार आहे. शिवाय पेढा, रसगुल्ला, गुलाबजामून, कलाकंद इत्यादी मिठाई तयार करण्यासाठी संयंत्र बसविण्यात येणार आहे.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव या वेळी करण्यात आला.

उत्पादकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा

यावेळी प्रमुख अतिथी एकनाथ खडसे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करताना प्राथमिक संस्थांची संख्या वाढली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच सर्व उत्पादकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. संघाचे भाग भांडवल वाढविण्यासाठी सर्व संस्थांनी संघास सहकार्य करावे तसेच भविष्यात देखील प्रगतीसाठी हातभार लावावा असेही सांगत त्यांनी संचालक मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

या सभेमध्ये एकनाथ खडसे यांच्यासह दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, संचालक आमदार सुरेश भोळे, अशोक पाटील, अशोक चौधरी, श्रावण ब्रम्हे, प्रल्हाद पाटील, मधुकर राणे, जगदीश बढे, सुभाष टोके, श्यामल झांबरे, सुनिता पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक मनोज लिमये सहभागी झाले होते.