शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ तालुक्यातील साकरी प्रकल्पातून परवानगीपेक्षा उचलण्यात आले दुप्पट गौणखनिज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:08 IST

जिल्हा परिषदेच्या साकरी पाझर तलावातून २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही ठेकेदाराने त्यापेक्षा दुप्पट गौणखनिज उचलल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी केलेल्या मोजणी उघडकीस आले आहे.

ठळक मुद्दे९६ लाख ८० हजार रुपयांची महसूल बुडणारअजूनही गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरूमहसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकरी येथे जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही ठेकेदाराने त्यापेक्षा दुप्पट गौणखनिज उचलल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी केलेल्या मोजणी उघडकीस आले आहे. त्यामुळे ठेकेदाराने तब्बल ९६ लाख ८० हजार रुपये महसूल बुडविल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरीही महसूल प्रशासन अधिकारी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पहात आहे. हा प्रकार कुणाच्या आशीवार्दाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या बैठकीत आवाज उठवला होता, तर ‘लोकमत’नेही यासंदर्भात प्रकरण लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी खोदकाम किती झाले व किती ब्रास गौणखनिज उचलण्यात आले? यासाठी मोजमाप केले.भुसावळ शहरापासून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यासाठी साकरी येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातून २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराने काढली आहे. ठेका घेताना खोदकाम किती करायचे? रॉयल्टी किती भरावी? या सर्व बाबींचा विचार करून ठेका दिला जातो. ठेकेदाराने काम सुरू करायच्या वेळी साकरी पाझर तलावातून दोन महिन्यात सहा डंपर लावून दोन टप्प्यात २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी काढली. त्यानंतर मात्र २० ते २२ डंपर लावून आतापर्यंत रात्रंदिवस शासकीय मोजमापानुसार २७ हजार क्युबिक मीटर म्हणजे २८ हजार फूट खोदकाम करण्यात आले आहे. यातून ४२ हजार ब्रास गौणखनिज उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे २२ हजार ब्रास अतिरिक्त उचलल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या २२ हजार ब्रास मुरमाची रॉयल्टी तब्बल ९६ लाख ८० हजार असल्याचे सांगण्यात आले. ठेकेदार हा महसूल बुडवित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा केवळ एक पाझर तलाव आहे. याप्रमाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्पातून गौणखनिज उचलण्यात येत आहे. या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढावा, असे लंगडे समर्थन महसूल विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या म्हणण्यानुसार प्रकल्प किती खोल करावा याची मर्यादा असते, तर पाणीसाठा करण्यासाठी गाढव उचलण्यात यावा, असे संकेत आहे. त्यात गौणखनिज जरी उचलण्यात येत असले तरीही ठेका घेताना रॉयल्टी भरावी, असे नमूद आहे. तरीही संबंधित ठेकेदाराने या प्रकल्पातून गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हस्कर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसीव्ह केला नाही. त्यामुळे संपर्क झाला नाही.