शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांचे मोठे आव्हान असताना संचालकांना कार्यमुक्त करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.पी. पाटील यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.पी. पाटील यांची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे संचालकपदावर नियुक्ती झाली आहे. पण, विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांचे मोठे आव्हान असताना संचालकांना कार्यमुक्त करणे, हे विद्यार्थी हिताचे नाही. त्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्‍यात येऊ नये, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

सद्य:स्थितीला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व महत्त्वाच्या पदांवर प्रभारी पदभार सोपविला आहे. केवळ परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक हे एकमेव पद नियमित आहे. मात्र, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांची मुक्त विद्यापीठातील परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालकपदावर नियुक्ती करण्‍यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या एकमेव नियमित असलेल्या पदावरसुद्धा आता प्रभारी अधिकारी नेमण्याची वेळ आली आहे. सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. काही परीक्षांचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षांचे मोठे आव्हान सुरू असताना, संचालकांना कार्यमुक्त करणे, हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे कार्यमुक्त करू नये, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एल.पी. देशमुख, दीपक पाटील यांनी केली आहे.