शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला ‘दान’, आता विकासाची अपेक्षा

By admin | Updated: February 25, 2017 00:55 IST

जळगाव : मतदान रूपाने जिल्ह्यातील जनतेने भाजपाला भरभरून दान दिले. आता भाजपाकडून जनतेला विकासाची अपेक्षा आहे.

जळगाव : मतदान रूपाने जिल्ह्यातील जनतेने भाजपाला भरभरून दान दिले. आता भाजपाकडून जनतेला विकासाची अपेक्षा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विकास कामांसाठी आचारसंहितेचा अडसर होता. आता मात्र तो दूर झाला आहे. त्यांनी शहरासह जिल्ह्यातील रखडलेल्या विकास कामांना गती द्यावी व नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकसभेचे दोन खासदार, विधान सभेतील सहा आमदार, विधान परिषदेतील दोन आमदार, जिल्हा बॅँक, जिल्हा दूध संघ,  कृषि उत्पन्न बाजार समित्या,  नगरपालिका व आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये या जिल्ह्याने भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे. एवढ्या प्रचंड ताकदीचा वापर भाजपाने वापर करावा.  पालकमंत्री आज शहरात : महामार्ग, समांतर रस्ते, २५ कोटी, गाळ्यांचा प्रश्न कायमशहर व जिल्ह्यातून जाणाºया महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, महामार्गाची दुरूस्ती, महापालिकेस शासनाने कबुल केलेल्या २५ कोटींच्या विकास निधीचा प्रस्ताव अशा विविध रेंगाळलेल्या प्रश्नात मदतीचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात यापूर्वी केलेल्या तीन दौºयात दिले आहे. आता आचारसंहिताही संपली असल्याने या प्रलंबित प्रश्नांच्या शुभारंभाला मुहूर्त मिळायला हवा.जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारण्यास कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी नकार दिल्यानंतर ही जबाबदारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली. चंद्रकात पाटील यांचा या जिल्ह्याचा अभ्यास असल्यामुळेही त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर ही जबाबदारी आल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जिल्ह्यात येऊन भेटी-गाठी घेतल्या. याच काळात विधान परिषद पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्याने बंधनांमुळे केवळ गाठी-भेटी व काही आश्वासने त्यांनी त्यावेळी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू झाली. आता ही आचारसंहिताही संपली आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी.चौपदरीकरणाला सुरूवात केव्हा?चौपदरीकरणाच्या कामासाठी दोन टप्प्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप कामाला प्रारंभ नाही. ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. समांतर रस्त्यांचेही भिजत घोंगडे कायम असून महामार्गावरील अतिक्रमण कायम आहेत. तारीख पे तारीख दिली जात आहे.  सुस्त प्रशासन जिल्ह्णातील प्रशासन ढेपाळले आहे. आचारसंहितेचे कारण सांगून कामे टाळली जात होती. सुस्त झालेल्या यंत्रणेला जागे करण्याची जबाबदारी आता पालकमंत्र्यांची आहे. कामांचा प्राधान्य क्रम ठरविणे आवश्यक आहे.