यावल,दि.7- तालुक्यातील डोणगाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या मात्र हल्ली गणेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या शेत गट नं. 38/1 व 2 मधून दोन लाख 83 हजार रुपयाचा सहा ट्रॅक्टर भरलेला 210 क्विंटल मक्याची उपसरपंचांसह सदस्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
6 मे च्या रात्री उपसरपंचासह सदस्यांनी मका चोरून नेल्याचा आरोप शेतक:याने केला आह़े तालुक्यातील डोणगाव येथील शेत गट नं. 38/1 व 38 /2 हे 24 बिघे शेत ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहे तर सध्या हे शेत गावातील गणेश पंडीत भालेराव यांच्या ताब्यात आहे. या शेतातून सहा ट्रॅक्टरमध्ये भरलेला 210 क्विंटल मका (किंमत सुमारे दोन लाख 83 हजार) चंद्रकांत अभिमन पाटील, सुधीर अभिमन पाटील, उपसरपंच विनोद शालीक पाटील, ग्रा.पं.सदस्य एकनाथ पाटील, निलेश पाटील, मंदाकिनी पाटील, सरलाबाई पाटील, विजय पाटील, पंजाबराव पाटील, शालीक दौलत पाटील हिरामण शालीक पाटील, व त्यांच्या सोबतच्या 20 ते 25 जनांनी 6 मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास लांबवला़