शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

18 महिन्यात राज्यभरात 18 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार - नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:45 IST

‘लोकमत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीत दिलखुलास संवाद

ठळक मुद्दे जळगावातून अभियानास प्रारंभउत्कृष्ट कार्यासाठी लाखाचे बक्षीस

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - मोतीबिंदूविषयी माहिती नसणे अथवा आर्थिक परिस्थितीअभावी उपचार न घेणे यामुळे रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी 1 डिसेंबर 2017  ते 15 ऑगस्ट 2019 या 18 महिन्यात  मोतीबिंदू मुक्त हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ आज जळगावात आज झाला. 18 महिन्यांच्या काळात 18 लाख शस्त्रक्रिया करण्यात येणार  असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख तथा वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात आयोजित मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र मोहिमेसाठी जळगावात आलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांनी गुरुवारी  सायंकाळी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी त्यांचे स्वागत केले. आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग प्रथमच एकत्रया मोहिमेसाठी आरोग्य तसेच वैद्यकीय शिक्षण विभाग प्रथमच एकत्र आला असून यासाठी  आदिवासी विकास विभाग तसेच सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यात 8 हजार मोतीबिंदूचे रुग्णदेशात 1.4 टक्के लोकांना मोतीबिंदूमुळे अंधत्व येते. जळगाव जिल्ह्यातही ही संख्या मोठी आहे. जळगावसह, पाचोरा, अमळनेर व फैजपूर येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये एक लाख रुग्णांमध्ये 30 हजार डोळ्य़ांच्या विकाराचे रुग्ण आढळून आले. त्यात जिल्ह्यात 8 हजार जणांना मोतीबिंदू असल्याचे दिसून आले असल्याचे डॉ. लहाने म्हणाले.  त्यामुळे या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना पुढे आली व तिला जळगावातून सुरुवात झाली आहे. तीन आठवडय़ात घर बसल्या मिळणार चष्माअनेक रुग्णांची चष्मा घेण्याचीही स्थिती नसत. त्यामुळे या मोहिमेंतर्गत गरजूंना चष्माही मोफत मिळावा म्हणून नियोजन करण्यात आले असून राज्यात त्या-त्या ठिकाणी नेत्रतज्ज्ञ अशा रुग्णांची तपासणी करतील व रुग्णासाठी आवश्यक चष्याचा क्रमांक आम्हाला इ-मेलद्वारे कळवतील. त्यानुसार त्या त्या रुग्णाचा चष्मा त्यांना तीन आठवडय़ात घर बसल्या मिळेल, अशी ग्वाही डॉ. लहाने यांनी दिली. एका महिन्यात एक लाख शस्त्रक्रिया शक्य डॉ. लहाने यांनी 18 महिन्यांच्या मोहिमेचे संपूर्ण नियोजन  मांडले. आरोग्य विभागाकडे डोळ्य़ांच्या शस्त्रक्रियेसाठी 101 शस्त्रक्रियागृह असून त्यातील 24 बंद आहे.  जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे आठवडय़ातून किमान 5 दिवस शस्त्रक्रिया होऊ शकतात. आठवडाभरात 20 शस्त्रक्रियांचे नियोजन केले आहे. त्यानुसार 60 ठिकाणी या शस्त्रक्रिया झाल्यातर 1200 शस्त्रक्रिया येथे होतील. अशाच प्रकारे वैद्यकीय महाविद्यालयाच्या 16 व इतर चार अशा 20 ठिकाणी प्रत्येकी दोन खाटांवर शस्त्रक्रिया केल्यास दररोज 400 शस्त्रक्रिया, 22  महापालिकांचे रुग्णालये, 150 स्वसंसेवी संस्था आणि खाजगी रुग्णालयांमार्फत आठवडय़ातून पाच मोफत शस्त्रक्रिया असे सर्व ठिकाणी मिळून दर महिन्याला एक लाख शस्त्रक्रिया होतील.35 जिल्ह्यात जाऊन शस्त्रक्रिया करणारमोतीबिंदूमुक्तीच्या अभियानासाठी आपण राज्यातील 35 जिल्ह्यात जाऊन शस्त्रक्रिया करणार असल्याचा निर्धार डॉ. लहाने यांनी या वेळी बोलून दाखविला. यामध्ये नंदुरबार, वाशिम, गडचिरोलीसह इतर आदिवासी भागातील जिल्ह्यांमध्ये जाऊन 400 शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. 18 महिन्यात 18 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणारवाशिम जिल्ह्यात झालेल्या जंतूसंसर्गामुळे अनेकांची दृष्टी गेली. त्यानंतर राज्यात गरजूंवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे बंद झाल्याने सर्वत्र या आजाराचे रुग्ण वाढत गेले. त्यामुळे आता हा सर्व अनुशेष भरून काढायचा  आहे. त्यामुळे हे अभियान राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला. मला दररोज मिळतो अनोखा आनंदज्या रुग्णांना दिसत नाही, ऐकू येत नाही अशा रुग्णांवर मी उपचार करतो, असे डॉ. लहाने यांनी सांगून या गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दिसू लागते व ते मायेने चेह:यावर जो हात फिरवितात आणि त्यांच्या चेह:यावरील समाधान पाहून जो आनंद मिळतो तो कोठे मिळणार, मात्र मला हा मोठा अनोखा आनंद दररोज मिळतो, असे डॉ. लहाने यांनी आवजरून नमूद केले. या गरजू रुग्णांवर बिनटाक्यांची शस्त्रक्रिया व्हावी, यासाठी आपण तत्कालीन सरकारकडे आग्रह धरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 29 नोव्हेंबर रोजी जळगावात राज्यभरातील प्राध्यापकांची बैठकया मोहिमेसाठी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राध्यापकांची बैठक बोलविली असून यामध्ये 18 जण येणार आहेत. या बैठकीत त्यांना सूचना देऊन मोहिमेचे नियोजन सांगण्यात येईल व 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन होऊन या मोहिमेला राज्यभरात सुरुवात होईल, असे डॉ. लहाने म्हणाले.   त्यानंतर 15 ऑगस्ट 2019र्पयत 18 लाख शस्त्रक्रिया करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 685 नेत्रतंत्रज्ञांवरही वेगवेगळी जबाबदारीराज्यात 685 नेत्रतंत्रज्ञ असून प्रत्येक जिल्ह्यात 20 ते 25 तंत्रज्ञांवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. शस्त्रक्रिया हे डॉक्टरांचे कर्तव्यचप्रत्येक ठिकाणी नियुक्त नेत्रतज्ज्ञाने आवश्यक त्या ठिकाणी रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असून शासन त्यांना त्याचाच पगार देते, असे परखड मत डॉ. लहाने यांनी मांडून प्रत्येक डॉक्टराचे कर्तव्यच असल्याचे ते म्हणाले. सध्या सोपविण्यात आलेल्या जबाबदारीत कोणी  हलगर्जीपणा केल्यास कारवाईदेखील होऊ शकत. या मोहिमेमध्ये आशा वर्करचीही मदत घेतली जात आहे.उत्कृष्ट कार्यासाठी लाखाचे बक्षीसमोतीबिंदूमुक्तीच्या कामात ज्या जिल्ह्यात जास्त ऑपरेशन होतील त्या जिल्ह्याला, नेत्रतज्ज्ञाला प्रत्येकी एक लाखाचे द्वितीय क्रमांकाला 50 हजार तर परिचारिकांना 20, 15, 10 हजार असे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. 

वृद्धाश्रमातही शिबिर व्हावेवृद्धांना डोळ्य़ांचे अधिक विकार होत असतात. त्यामुळे वृद्धाश्रमातही जाऊन तपासणी करण्याबाबत सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 18 महिने दररोज घेणार आढावाया मोहिमेसाठी आपण प्रत्येक जिल्ह्यांचा मिळून व्हॉटस् अॅप ग्रुप तयार केला असून व्हिडिओ कॉन्फरन्स, बैठका यातून आपण दररोज या मोहिमेचा आढावा घेणार असल्याचे डॉ.  लहाने यांनी सांगितले. ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जातात, तेथील रुग्णांची वर्गवारी करून त्यांना त्या त्या आजारासाठी  उपचारार्थ आवश्यक त्या ठिकाणी पाठविले जाते, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. यासाठी जीवनदायी योजना, मुख्यमंत्री निधी यातून उपचार केले जातात. तसेच राळेगणसिद्धी येथे प्रत्येक रुग्णाला स्टीकर देऊन ते घराला लावायचे सांगितले व आशा वर्कर त्यांना या बाबत कळविते, अशी दुसरी पद्धत राबविल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले. चांगले काम करताना अडथळे येणारचमला ज्या-ज्या वेळी अडथळे आले त्या वेळी मी विचार केला यात आपली चूक नाही तर आपण विनाकारण विचार करू नये, असे ठरविले. जे सत्य आहे ते सत्यच राहणार व सत्य काम केल्यास त्रास होणारच असेही डॉ. लहाने यांचे म्हणणे आहे. मात्र माझी आई, रुग्ण व भगवंतांचा मला आशीर्वाद असल्याचे  ते म्हणाले. आईच्या किडनी दानाने सामाजिक कार्याचा निर्णयमाझी किडनी ज्या वेळी निकामी झाली त्यावेळी आईने मला किडनी दिली. मात्र तिने डॉक्टरांना सांगितले, गरज पडल्यास दुसरीही किडनी द्या. आईच्या या भावनेने मला सामाजिक कार्य करण्यास प्रेरणा मिळाल्याचे डॉ. लहाने यांनी नमूद केले.आजर्पयत 1 लाख 51 हजार 803 शस्त्रक्रियाडॉ. लहाने यांची शस्त्रक्रिया करण्याची आकडेवारी तोंडपाठ असते. 23 नोव्हेंबर्पयत आपण  1 लाख 51 हजार 803 शस्त्रक्रिया केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आता जळगावात 600 शस्त्रक्रिया करणार असून त्याचीही यात भर पडेल, असे ते म्हणाले.