शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुत्रे उठले जळगावकरांच्या जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:32 IST

चालढकल करणे योग्य नाही

विकास पाटीलमोकाट कुत्रे जळगावकरांच्या जिवावर उठले आहेत. दररोज ते अबालवृद्धांचे लचके तोडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षीत असताना केवळ चालढकल केली जात असल्याने शहरवासी नाराज आहेत.जळगावात २१ आॅक्टोबर रोजी गोपाळपुरा भागात एका सात वर्षांच्या बालकावर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढविला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. याचवेळी त्या बालकाची बहिणही कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली. या घटनेनंतर शहर व परिसरात याच दिवशी आणखी इतर तीन बालकांना कुत्र्यांनी लक्ष्य बनविले. दररोज कुत्रे हल्ले करीत आहे.जळगाव शहरात कदापी कुणालाही सहज विश्वास बसणार नाही मात्र ५ हजार मोकाट कुत्रे आहेत. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शहरात हिंडत असतात. रात्रीच्यावेळी तर भर रस्त्यावर ते ठिय्या मांडतात व रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांचा व पादचाºयांचा पाठलाग करतात. त्यामुळे रात्रपाळीची नोकरी करणारे त्रस्त आहेत.गेल्या नऊ महिन्यात कुत्र्यांनी साधारणत: साडेचार हजार नागरिकांना चावा घेतला व त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. ही फक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारी आहे. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातही उपचार घेतात, त्यांची नोंद नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही प्रशासन दखल घेण्यास तयार नाही, हे विशेष. गोपाळपुºयातील घटनेनंतर आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या आरोग्य विभागाची बैठक घेवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदनगर पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी डॉग रुम तयार केली आहे. तशीच रुम तयार करुन निर्बीजीकरण करण्याचे ठरविले आहे. एका कुत्र्यावर एक हजार रुपये खर्च येणार आहे, त्यासाठी महासभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. महासभेत निर्णय होईल, त्यानंतर पुढे प्रक्रिया सुरु होईल अन् कुत्र्यांचे चावे थांबतील. मात्र तोपर्यंत काय?मनपाकडे डॉग व्हॅन आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून शहरापासून सोडण्याचे काम या वाहनाद्वारे होत असे. मात्र आता हे वाहन कुठे आहे? हे महापालिकेलाच माहित. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त तत्काळ करणे आवश्यक आहे. मनपाने नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबतीत चालढकल करणे योग्य नाही.यापूर्वीही शहरात एकाच दिवशी १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी मनपा प्रशासनाकडूनकुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले मात्र उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नाराजी आहे. प्रशासन जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे.