जळगाव - पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीतील घरासमोर लावलेली डॉक्टराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी डॉक्टराच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रायसोनी नगरातील रहिवासी भरत दत्तू पाटील हे व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यांचे पिंप्राळ्यातील मयुर कॉलनी येथे आणखी एक घर आहे. अधून-मूधन ते पिंप्राळ्यातील घरी येत असतात. दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने जामनेर तालुक्यातील पाळधी जाणे असल्यामुळे त्यांनी पिंप्राळा येथील घरासमोर दुचाकी (क्र. एमएच.१९. बीडब्ल्यू.१०४६) ही १२ नोव्हेंबर रोजी उभी केली होती. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाळधी येथून परतल्यानंतर त्यांना घरासमोर उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता, मिळून न आल्यामुळे दुचाकी चोरी झाल्याची खात्री त्यांना झाला. अखेर डॉ. भरत पाटील यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. चंद्रकांत पाटील करीत आहे.