धरणगाव : येथील कीर्तनकार प्रा.सी.एस. पाटील यांचा डॉक्टर मुलगा व सून यांच्या संसारवेलीवर ‘आर्या’ हे कन्यार} फुलल्याने या डॉक्टर दाम्पत्याने कन्याजन्माचे जंगी स्वागत केले. यानिमित्त कीर्तन सोहळा आयोजित करून समाजाला स्त्रीजन्माची महती पटवून दिली. तसेच कन्येचा जन्मसोहळा गोड करण्यासाठी आप्तेष्ट आणि मित्र परिवाराला प्रसादरूपी पुरणपोळीचे जेवण दिले आणि या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही सहभागी करून घेतले व समाजासमोर आदर्श उभा केला. संत साहित्याचे अभ्यासक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करीत आहेत. त्यांचा परिवारही सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ.ज्ञानेश आणि सून डॉ.प्रियंका यांच्या संसारवेलीवर कन्येच्या रूपाने दुसरे फूल उमलले. आर्या हिच्या रूपाने घरात कन्यार} आल्याने आजी-आजोबांसह परिवाराला मोठा आनंद झाला. या कन्येच्या स्वागतासाठी डॉक्टर दाम्पत्याने शनिवारी सकाळी कीर्तन आयोजित केले आणि दुपारी खीर-पुरणपोळीचा महाप्रसाद हजार लोकांना देऊन आनंदोत्सव साजरा केला. या वेळी ह.भ.प. गुलाब महाराज लोणकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी स्त्रीजन्माची महती विशद करून स्त्रियांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी चि.आर्या हिचे पूजन प्रा.चत्रभुज व नंदा पाटील, तसेच डॉ.ज्ञानेश-डॉ.प्रियंका यांनी केले. कार्यक्रमाला ह.भ.प. अंबादास महाराज (कळमसरेकर), महंत ह.भ.प. भगवान महाराज, प्रा.रमेश महाजन, प्रा.मंगला पाटील, प्रा.सी.के. पाटील, प्रा.एम.एल. पाटील (धुळे), प्राचार्य डॉ.एस.आर. पाटील (म्हसदी), पी.आर. सोसायटीचे अध्यक्ष, डॉ.अरुण कुळकर्णी, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, माजी नगराध्यक्ष अजय पगारिया, शर्मिला दगडूसिंग पाटील, प्रा.वा.ना. आंधळे, प्रा.के.एम. पाटील, प्राचार्य डॉ.टी.एस. बिराजदार, प्रा.मेजर अरुण वळवी, प्रा.छाया सुखदाणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी.के. पाटील, प्रा.मनीषा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉक्टर दाम्पत्याने ‘कन्या’जन्माचे केले जंगी स्वागत..
By admin | Updated: March 21, 2017 00:06 IST