शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तीनच महिन्यात डॉक्टर मोरेंनी जिंकली कर्मचा:यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:44 IST

जळगाव जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभाग सुन्न : 2009 नंतर मिळाले होते कायम अधिकारी

ठळक मुद्देकर्मचा:यांसोबत करायचे हसत-खेळत काम दालनाचा दरवाजा बंदकर्मचा:यांना धक्का

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12 - जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील राज्य शासनाच्या कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे (वय 56)  यांचा धारदार करवतीने गळा चिरुन खून झाल्याची थरारक घटना सोमवारी उघड झाल्यानंतर दुस:या दिवशीही जिल्हा रुग्णालय परिसरातील कुष्ठरोग विभाग सुन्न होता. सर्वांमध्ये रमणारे व कर्मचा:यांसोबत जेवण करणारे मनमिळावू अधिकारी गेल्याने कर्मचा:यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तीन महिन्यात त्यांनी सर्वाची मने जिंकली होती. 2009पासून कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकाचा पदभार हा प्रभारी अधिका:यांकडे होता. जून महिन्यात डॉ. मोरे यांच्या रुपाने येथे कायम अधिकारी मिळाले होते. मात्र त्यांचा खून झाल्याने या विभागातील कर्मचा:यांना धक्का बसला आहे.  मनमिळावू अधिकारी गेल्याने त्यांच्या आठवणींनी व त्यांची खुर्चीही रिकामी असल्याने कंठ दाटून येत असल्याचे कर्मचारी म्हणाले. त्यामुळे डॉ. मोरे यांच्या दालनाचा दरवाजा मंगळवारी बंद करुन ठेवला होता.डॉ. मोरे  यांनी कर्मचा:यांवर कधीही अधिकार गाजविला नाही, असे येथील कर्मचा:यांनी  सांगितले. कर्मचारी जेवण करीत असताना त्यांनी डॉ. मोरे यांना जेवणाचे म्हटले तर ते कधीही नाही म्हटले नाही व किमान दोन घास तरी ते कर्मचा:यांसोबत हसत-खेळत घेत असत.  डॉ. मोरे हे वरिष्ठ अधिकारी असले तरी ते कधीच कोणाशीही चढय़ा आवाजात न बोलता सर्वांशी नम्रपणे, प्रेमाने बोलत होते, असे कर्मचा:यांनी सांगून  डॉ. मोरे यांचा सर्वजण मोठा आदर, सन्मान करीत होते, असेही कर्मचा:यांनी जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभागात भेट दिली असता सांगितले.