शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेला माल ठेवण्यासाठी जागा देता का जागा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:16 IST

जळगाव : अन्न व औषध विभागामार्फत अवैध गुटखा पकडला जातो, मात्र हा जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी या विभागाकडे ...

जळगाव : अन्न व औषध विभागामार्फत अवैध गुटखा पकडला जातो, मात्र हा जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी या विभागाकडे जागाच नसल्याने ‘जागा देता का जागा’ अशी म्हणण्याची वेळ या विभागावर आलेली आहे. मोठ्या उत्साहात या विभागाकडून अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाया केल्या जातात, मात्र हा उत्साह तेवढ्यापुरताच मर्यादीत राहतो. महापालिकेच्या मालकीच्या आंबेडकर मार्केटमध्ये या विभागाचे कार्यालय भाड्याच्या जागेत आहे. स्वत:च्या मालकीचेही कार्यालय या विभागाला मिळालेले नाही.

गुटखा, मावा यासह अवैध खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुध्द अन्न व औषध विभागाकडून कारवाया केल्या जातात, त्याशिवाय हॉटेल, ढाबे यासह इतर खाद्य पदार्थ तयार करणारे फर्म, आस्थापना असोत किंवा विक्री करणारे यांच्याकडील अन्नाचे नमुने घेऊन ते खाण्यास योग्य आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाते. हे नमुने प्रयोग शाळेत पाठविले जातात. दरम्यान, या विभागाकडे जप्त केलेला माल साठविण्यासाठी जागेची वाणवा आहे, तशीच मनुष्यबळाची वाणवा आहे.

त्याशिवाय सरकारी वाहन देखील नाही. एखाद्या तालुका पातळीवर किंवा ग्रामीण भागात गुटखा किंवा अन्य कोणच्या अवैध खाद्य पदार्थाचा साठा पकडला तर तो माल आणण्यासाठी भाड्यानेच वाहन शोधावे लागते. वाहन, हमाल वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याही पुढे गेल्यानंतर हा माल साठविण्यासाठी गोदाम किंवा भाड्याची जागाही नाही. त्यामुळे कार्यालयच गोदाम झालेले आहे. दरम्यान, साठविलेला माल हा सहायक आयुक्तांच्या परवानगीने मनपाच्या डम्पीग ग्राऊंडमध्ये नष्ट केला जातो.

अन्न व औषध प्रशासनाच्या २०२०मध्ये केलेल्या कारवाया

जानेवारी -१

फेब्रुवारी -२

मार्च -०

एप्रिल -४

मे -३

जून -१

जुलै -१

ऑगस्ट -०

सप्टेंबर -१

ऑक्टोबर -०

नोव्हेंबर -०

डिसेंबर -१

वर्षभरात जप्त केला ३९ लाखाचा गुटखा

अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यात जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरुध्द १४ कारवाया केल्या. त्यात सर्वाधिक ११ कारवाया या लॉकडाऊन काळातच झालेल्या आहेत. या काळात ३६ लाख ६४ हजार ६५२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. वर्षभरात एकूण ३९ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. विक्रेत्यांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

जप्त साठा ठेवण्यासाठी जागा नाही

अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सध्या आंबेडकर मार्केटमध्ये मनपाच्या व्यापारी संकुलात भाड्याने आहे. याच कार्यालयात जप्त केलेला गुटखा ठेवला जातो, त्याशिवाय रद्दी व इतर अनावश्यक साहित्यही याच कार्यालयात ठेवले जात असल्याने धुळ व दुर्गंधीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयासाठी सरकारी जागा मायादेवी नगरात उपलब्ध करुन देण्यात आली आहे, मात्र शासनाकडून पुढे काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे केव्हा तेथे इमारत तयार होईल, हे सांगणे अवघडच आहे. सरकारी काम अन‌् सहा महिने थांब अशी स्थिती या विभागाची झालेली आहे.

--