शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

जळगावातील फुले मार्केटमधील गाळ्यांवर 4 डिसेंबर्पयत कारवाई करु नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:44 PM

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ठळक मुद्देगाळेधारकांची सर्वोच्च न्यायालयात धावगाळेधारकांना दिलासा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25 -  महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया 4 डिसेंबर्पयत करु नका असा आदेश सर्वोच्च न्यायायालयातील न्या. ए.के. सिक्री व न्या. अशोक भुषण यांनी शुक्रवारी दिले. ही जागा शासनाची आहे, अशी भूमिका गाळेधारकांकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे 907 गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुढील कामकाज 4 डिसेंबर रोजी होणार आहे.गाळे ताब्यात घेण्यासाठी मनपाकडून तयारी सुरू झाली होती. यासाठी मनपाने प्रथम 81 ब च्या सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून गाळेधारकांचे म्हणणे फेटाळून लावत त्यांनी एक महिन्याच्या आत गाळे खाली करून द्यावे म्हणून त्यांना नोटीस बजावली होती. महापालिकेच्या 81 बच्या कारवाईस गाळेधारकांनी उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालयातही आव्हान दिले असून त्यावर सुनावणीही सुरू होती. मनपा ने हे गाळे ताब्यात घेण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.18 संकुलांबाबत असे होते निर्णयमहापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांमधील गाळे निष्कासीत (रिकामे) करण्याची प्रक्रिया महापालिकेने 60 दिवसात सुरु करावी व रेडिरेकनरच्या दराने लिलाव  करुन गाळे भाडय़ाने द्यावेत, ही प्रक्रिया करीत असताना  शासनाने कोणताही हस्तक्षेप करू नये असे  आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिका प्रशासनाला दिले होते. तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या ठरावांवर शासनाने निर्णय घ्यावा व हा निर्णय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाशी सुसंगत असावा असेही  आदेशात म्हटले होते.रमेश खडके व मनोज मताणी यांनी दाखल केली याचिकामहापालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलांमधील गाळे ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव दोन महिन्यात करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 14 जुलै 2017 रोजी दिले होते. या आदेशाला आव्हान देणारी याचिका फुले मार्केटमधील गाळेधारक रमेश खडके, मनोज मताणी व इतर गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयात गाळेधारकांच्या वतीने अॅड. हरिश साळवे  यांनी काम पाहिले. ही जागा शासनाची होती व गाळेधारकांनी बनविलेल्या फेडरेशनला ही जागा देण्यास शासन अनुकूल होते अशी भूमिका गाळेधारकांच्या वतीने मांडण्यात आली. शासनाने भूमिका मांडावीसर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी राज्य शासनाला आदेश करून भूमिका मांडावी असे सांगितले. याप्रश्नी 4 डिसेंबर्पयत गाळेधारकांवर कोणतीही कारवाई नको असेही या आदेशात म्हटले आहे, अशी माहिती  सूत्रांनी दिली.गाळेधारकांना दिलासासर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता लांबणार असून गाळेधारकांनी यामुळे दिलासा मिळाला आहे. गाळेधारकांची सर्वोच्च न्यायालयात धावफुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सर्वोच्च न्यायायालयातील न्या. ए.के. सिक्री व न्या. अशोक भुषण यांच्या समोर सुनावणी झाली. गाळेधारकांच्या वतीने युक्तीवाद करत असताना अॅड. हरिश साळवे यांनी युक्तीवाद केला. गाळेधारकांवर होणा:या अन्यायाची कैफियत मांडून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या गाळे रिकामे करून त्यांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेस स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती.