‘हटातटाने पटा रंगवुनी, जटा धरशी का शिरी? मठाची उठाठेव का तरी’ ह्या फटक्यातून शाहीर राम जोशींनी ‘मठाची उठाठेव’ करणा:यांना फटकून काढलं असलं तरी ते कविवर्याचं अज्ञान होतं. मठाच्या ‘उठाठेवी’ला आजच्या भाषेत ‘सत्संग देणे’ म्हणतात. मठात येणा:या सेवक:याला ‘भवतापा’पासून दूर नेऊन ‘आत्मसुखाची हुडहुडी’ अनुभवून देणे हे सोपे नोहे. साक्षात सौंदर्योपभोगी देवेंद्रालासुद्धा हेवा वाटावा, असे ह्या अवतारी पुरुषांचे भाग्य असते. कारण त्यातले बहुतेक साक्षात ‘ययाती’चे अवतार असतात. ह्या थोर ‘अध्यात्म गुरूं’कडे सुंदर सुंदर तरुण ियांचे तारुण्य स्वत: होऊन चालून येत असते. मग काय, कोमल ह्रदयी मठपतींना त्यांच्या उद्धाराचे कार्य करण्यासाठी, नाईलाजाने पुन्हा तारुण्य स्वीकारावेच लागते. पण पामर जनास हे उमजेल तेव्हा ना! झोपलेल्या शिष्येला केवळ धीर देत, ‘भिऊ नकोस मी तुङया खाटेशी आहे’ हे सांगायला गेलेल्या अध्यात्मगुरुला, नतद्रष्ट पोलिसांनी तुरुंगात की हो नेऊन टाकले. मी त्या अधिका:याला विचारलं, ‘हा बुवा असा आहे, हे तुम्हाला आधी माहीत नव्हतं का?’ त्यावर तो म्हणाला, ‘ङिारपते कशी ही लाळ गळल्यावर कळले होते, तो संतच लंपट होता, चळल्यावर कळले होते.’ एका शिष्याला मी विचारलं, की पोलीस अधिका:याची प}ी दर्शनाला आलेली असूनही, हे कसं घडलं? यावर तो शिष्य लाजत सांगू लागला, ‘खडखडले खडाव पायी, धडधडली छाती तैसी, तो पदर रेशमी होता, ढळल्यावर कळले होते.’ मंदिराचा पुजारी ताडकन् म्हणाला, ‘ती पोर लकाकत आली, संतास दुभंगून गेली, तो संतही तप्तच होता, चळल्यावर कळले होते.’ मी त्या पोलीस अधिका:याला म्हणालो, ‘तुमच्यासारखे उच्च शिक्षित ह्यांच्या गळाला कसे काय लागतात हो?’ तो अधिकारी संतापून म्हणाला, ‘स्वयं म्हणे मनूचा मासा, त्राताच जगाचा आहे. तो होता बोंबील साधा, तळल्यावर कळले होते.’ मठपती तर गजाआड गेला. पण हजारो एकरावर पसरलेले त्याचे मठ, त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या शिष्यांनी गजबजलेले असतात. कारण - सेवेत शिष्य जे होते, ते लेचे पेचे नव्हते, ते होते दगडी दाणे, दळल्यावर कळले होते.’ शाहीर कविराय राम जोशींनी ‘पटा’ला रंगवून ‘जटा’शिरी का धरतोस, असा फटका मारला असला तरी तुम्ही पांढरा चोगा किंवा भली मोठी दाढी, आणि डोक्यावर केसांचं जंजाळ वाढवून, कपाळावर गंध ¨बद लावून, गावातून भटकून या. शेकडो लोक तुमच्या पाया पडतात की नाही ते बघा. सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या, भूतपूर्व साक्षात्कारी संत श्रीश्रीश्री फोकाराम दंडेवाले यांना मी जेल मधे जाऊन विचारलं, की तुम्ही ह्या संतपणाच्या धंद्यात कसे आलात, आणि कधीपासून आलात? तर फोकाराम हसत म्हणाले, ‘कसे आलात म्हणाल तर दाढीमिशा वाढवून आलो आणि कधी आलात म्हणाल तर, दाढीमिशी ब:यापैकी वाढल्यापासून आलो. दाढी आणि डोक्यावरचे केस वाढवले आणि चमत्कार झाला.’ पाच खून, सात दरोडे आणि नऊ बलात्काराच्या गुन्ह्यात खडी फोडत असलेल्या गजाआडच्या फोकारामांनी दोन दगडांच्या चिपळ्या करून आत्मकथा सांगायला सुरुवात केली, समजून संत मजला पाया पडून गेले, ते हात कायद्याचे मजला विकून गेले आलेत जोखण्याला संतत्व आज माङो, येऊन फक्त माझी दाढी बघून गेले सा:यांस ज्ञात झाली माझी अघोर कृत्ये, मी ‘धर्म’ बोललो अन् सारे धकून गेले
नको व्यासंग, करा सत्संग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:06 IST