शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

होळीच्या पूर्वध्येला दिवाळीसारखी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

फोटो २८सीटीआर ५७, १० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाभरात लागू करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ...

फोटो २८सीटीआर ५७, १०

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाभरात लागू करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. किराणा, भाजीपाला खरेदी सोबतच होळी सणासाठीदेखील पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आले. यासोबतच तळीरामांनीदेखील मद्याचा वाढीव साठा करून ठेवत गुटखा, तंबाखूचीदेखील तजवीज करून ठेवली. बाजारात खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे चौकाचौकात वाहतुकीची कोंडी झाली होती.

जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून संसर्ग वाढत असून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विविध निर्बंध लावले जात आहेत. त्यात दोन आठवड्यांपूर्वी जळगाव महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. यासोबतच चाळीसगाव, चोपडा येथेदेखील निर्बंध लादण्यात आले होते. त्यापाठोपाठ टप्प्याटप्प्याने विविध तालुक्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने निर्बंध लागू केले. तरीदेखील रुग्णसंख्या वाढतच असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ ते ३० मार्च दरम्यान जिल्हाभरात कडक निर्बंध लावण्यात आले. यामध्ये किराणा, भाजीपाला यासह सर्वच व्यवहार बंद राहणार आहे. केवळ दूध व औषध दुकाने सुरू राहणार असल्याने शनिवारी बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली.

दररोजच्या तुलनेत दीडपट विक्री

बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी वाढल्याने किराणा साहित्य व घरात लागणाऱ्या इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे दररोज होणाऱ्या व्यवहाराच्या तुलनेत दीडपटीने व्यवहार वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

संध्याकाळी गर्दीत पडली भर

बाजारपेठेत शनिवारी सकाळपासूनच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले होते. त्यानंतर संध्याकाळी तर अधिकच गर्दी वाढली. सुभाष चौक, महात्मा गांधी मार्केट, फुले मार्केट, गोलाणी मार्केट यासह शहरातील कॉलनी भागात देखील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

वाहतुकीची कोंडी

नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्यांवर तसेच चौकाचौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यामध्ये चित्रा चौक, कोर्ट चौक, टाॅवर चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ इत्यादी भागात वाहनांच्या रांगा लागून वाहतुकीची कोंडी झाली होती.

होळीच्या पूर्वसंध्येला दिवाळीसारखी गर्दी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ज्याप्रमाणे खरेदीसाठी गर्दी उसळते त्याप्रमाणेच तीन दिवसांच्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. तीन दिवसानंतर पुन्हा निर्बंध वाढतात की काय या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. महिला, पुरुषदेखील खरेदीसाठी बाहेर पडल्याने रस्त्या-रस्त्यांवर गर्दी दिसत होती. रविवारी होळी सण असून होळीच्या पूर्वसंध्येला जणू दिवाळीची खरेदी सुरू आहे की काय, असे चित्र शहरात दिसून आले.

पूजा साहित्य खरेदी

बंदच्या पार्श्वभूमीवर किराणा, भाजीपाला खरेदीसह नागरिकांनी होळी सणासाठी लागणाऱ्या पूजेचे साहित्यदेखील खरेदी केले. यामध्ये हार, कंगन, नारळ, फूल व इतर वस्तू घेऊन होळीच्या पूजेची तयारी करून ठेवली.

मद्याच्या दुकानावर खरेदीची लगबग

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मद्याची दुकाने बंद राहिल्याने अनेक दिवस तळीरामांना आपला घसा कोरडा ठेवावा लागला होता. हा अनुभव पाहता यावेळी तळीरामांनी मद्याच्या दुकानावर शनिवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. यामध्ये सकाळपासूनच अनेकांनी साठा करण्यास सुरुवात केली व संध्याकाळी तर अधिकच गर्दी वाढली होती. यासोबतच पानटपऱ्यादेखील बंद राहणार असल्याने अनेकांनी गुटखा, सिगारेट, तंबाखू यांचीही खरेदी करून ठेवली.

भाजीपाला महागला

तीन दिवस निर्बंध राहणार असल्याने शनिवारी शहरात अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजीपाल्याची मागणी वाढल्याने त्यांचे दरदेखील शुक्रवारच्या तुलनेत दीड पटीने वाढले.