शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात नवीन घरांसह जागांच्या खरेदीसाठी साधला दिवाळीचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:19 IST

व्यवसायासाठी दुकानांचाही शोध : 50च्या वर घरांची विक्री

ठळक मुद्देव्याजदर कमी झाल्याचा फायदा  वर्षभरानंतर पुन्हा उत्साहाचे वातावरण  

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22- दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते. रिअल इस्टेट क्षेत्रातही उलाढाल वाढली असून नवीन घर खरेदीस चांगला प्रतिसाद राहिला. दिवाळीच्या काळामध्ये शहरात 50च्यावर घरांची विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच व्यवसायासाठी तयार दुकान अथवा तशा जागांच्या खरेदीकडेही कल वाढत असल्याचे सांगण्यात आले. नवरात्रोत्सव व विजयादशमीपासून बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण होऊन घरांच्या खरेदीमध्येही उत्साह वाढला. नोटाबंदीनंतर जवळपास वर्षभरानंतर या क्षेत्रात चांगले वातावरण तयार झाले आहे.

रिअल इस्टेटमध्ये बदलतोय ट्रेंडरिअल इस्टेट क्षेत्रात रहिवासी घरासोबतच आता व्यावसायिक जागांकडेही कल वाढत असल्याचे चित्र आहे. राहण्यासाठी घर तर असावेच, सोबतच आता व्यवसाय करण्याच्या दृष्टीने दुकानांचा शोध घेतला जात आहे.  मोक्याच्या जागा पाहून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दुकान अथना मोकळ्य़ा जागांबाबत विचारणा करण्यात येत असून दिवाळीमध्येही यासाठी चांगला प्रतिसाद राहिल्याचे सांगण्यात आले. 

दिवाळीमध्ये इतर वस्तू खरेदीला प्राधान्यसाधारणत: घरांची खरेदी वर्षातील गुडीपाडवा, अक्षयतृतीया अथवा विजयादशमी या मुहूर्तावर अधिक केली जाते. दिवाळीमध्ये घरातील इतर वस्तू, वाहन, सोने-चांदी खरेदीला प्राधान्य असते. त्यामुळे घरांची जास्त खरेदी होत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

वर्षभरानंतर पुन्हा उत्साहाचे वातावरण  गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर रियल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी पसरली व या क्षेत्रात कधी नव्हे एवढे चिंतेचे वातावरण पसरले. हातचा पैसा गेल्याने यातील गुंतवणूक थांबली व बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले. मात्र आता वर्षभरानंतर  पुन्हा घर खरेदीला प्रतिसाद वाढला आहे. जळगावात तयार घरांसह जमिनीला चांगली मागणी असल्याने या व्यवसायाने चांगले प्रस्थ तयार केलेले आहे. मात्र वर्षभरात यामध्ये काहीसी मरगळ आलेली होती. आता हे सर्व वातावरण निवळले असून विजयादशमीपासून यात पूर्ववैभव येण्यास सुरुवात झाली. दिवाळीमध्येही खरेदीचा उत्साह कायम राहिला.

व्याजदर कमी झाल्याचा फायदा  सध्या बँकाचे गृहकर्जासाठीचे व्याजदरही कमी आहे. त्याचाही फायदा घेतला जात असून सामान्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.     

विजयादशमीपासून घर खरेदीसाठी चांगले वातावरण असून दिवाळीमध्ये चांगला प्रतिसाद राहिला. - श्रीकांत खटोड, बांधकाम व्यावसायिक.

रिअल इस्टेटमध्ये आता व्यावसायिक जागांकडेही कल वाढत असून दिवाळीमध्ये त्याबाबत अधिकपसंतीदिसूनआली.-विनय पारख, संचालक पीपीआरएल.