शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरुन जि.प. अध्यक्ष व सदस्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 22:27 IST

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरत या निधीचे वितरण करण्याची मागणी केली. तसेच या निधीवरुन भाजपाचे जि.प.सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती जि.प.सुत्रांनी दिली आहे. 

ठळक मुद्देउपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटकेसर्व सदस्यांना लवरकच निधी वितरण करू जि.प.अध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.१३,जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला ४० कोटींतुन चार महिने उलटूनही कोणतेही काम न झाल्याने हा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची भिती असल्याचे ‘लोकमत’ ने १३ सप्टेंबर रोजीच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावर बुधवारी जि.प.सदस्यांनी जि.प.अध्यक्षांना चांगलेच धारेवर धरत या निधीचे वितरण करण्याची मागणी केली. तसेच या निधीवरुन भाजपाचे जि.प.सदस्य व अध्यक्षांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती जि.प.सुत्रांनी दिली आहे. 

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला २०१८ या वर्षासाठी विभागनिहाय देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामासाठी एकूण अंदाजे चाळीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र चार महिने उलटून देखील या निधीतील रक्कम जि.प.सदस्यांना मिळालेली नाही. त्यामुळे जि.प.सदस्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या सदस्यांमध्ये नाराजी वाढली असून, जि.प.अध्यक्षांकडून दुर्लक्ष होत असल्याचेही सदस्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 

उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये उडाले खटकेजिल्हा परिषदेच्या विविध विभागाची पाहणी करताना, काही सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजुर झालेल्या निधीबाबत जि.प.अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जि.प.अध्यक्षा कार्यालयात येत नसल्याने निधीचे वितरण होत नसल्याचा आरोप जि.प.सदस्यांनी केला. त्यावर जि.प.अध्यक्षांनी सदस्यांचा आरोपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या चेंबरमध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण सभापती पोपट भोळे, सदस्या पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे, प्रताप पाटील व जयपाल बोदडे आदी उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्षा व सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. 

निधीचे लवकरच नियोजन करणारत्यानंतर जि.प.अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेवून, जिल्हा नियोजन मंडळाकडून ४० कोटीचा निधी मंजूर झाला असला तरी या निधीला शासनाने ३० टक्के कात्री लावली आहे. तसेच त्या निधीमध्ये गेल्या वर्षाचे दायित्व असल्यामुळे निधी तोकडा पडणार असल्याचे अध्यक्षा उज्वला पाटील यांनी सांगितले.यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोरमहाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण सभापती पोपट भोळे, आरोग्य सभापती दिलीप पाटील व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर आदी उपस्थित होते. तसेच निधी बाबत पालकमंत्र्यांकडे दोन वेळा प्रस्ताव दिले असून, पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला  असून, निधी वाढवून मिळण्याची अपेक्षा असल्याची जि.प.अध्यक्षांनी दिली. 

चार विभागाच्या निधीचे नियोजन बाकीजिल्हा परिषदेच्या नागरी सुविधा, जनसुविधा, तिर्थक्षेत्र व ग्रामिण रस्ते यांचे नियोजन बाकी असल्याची माहिती उज्वला पाटील यांनी दिली. या चार हेडवर निधी असला तरी देणे बाकी आहे. अधिक प्रस्ताव व निधी कमी असल्याने अडचण आहे. मात्र निधीचे तात्काळ नियोजन करून निधी वितरीत केला जाणार आहे. नागरी सुविधाला १ कोटीचा निधी आहे. जाहीर झाला मात्र त्यात ३० टक्के कपात होवून ७० लाख मिळणार आहेत.जनसुविधेसाठी २ कोटी ४५ मंजूर आहेत. मात्र खर्चासाठी १ कोटी ६५ मिळणार आहे. तर ग्रामीण रस्त्यासाठी मंजूर ९ कोटीमधून ६ कोटी तर तिर्थक्षेत्राच्या २ कोटीतून खर्चासाठी १ कोटी २५ लाख उपलब्ध होणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.