शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. शाळेचेही विद्यार्थी करताहेत ई- लायब्ररीचे वाचन

By admin | Updated: April 27, 2017 11:42 IST

पाचोरा तालुक्यातील बाळद सारख्या छोटय़ाशा गावातील जि. प. शाळेचे विद्यार्थी दररोज ई-लायब्ररीचे वाचन करीत आहेत.

ऑनलाइन लोकमत / अनिल पाटील बाळद, जि. जळगाव दि. 27 - जि.प. शाळा म्हणजे सुविधांचा अभाव, तंत्रसुविधा तर दूरच असा सर्वसाधारणपणे दृष्टीकोन असतो, मात्र आता काही शाळा विविध सुविधांसह डिजिटल तंत्रज्ञानाचा वापरही करू लागल्या आहेत.  अशाच प्रकारे पाचोरा तालुक्यातील बाळद सारख्या छोटय़ाशा गावातील जि. प. शाळेचे  विद्यार्थी दररोज ई-लायब्ररीचे वाचन करीत आहेत. जलद प्रगत शैक्षणिक  महाराष्ट्र उपक्रमांतर्गत वाचन संस्कृती वाढवणे, टिकवणे, जोपासणे हे ध्येय डोळ्य़ासमोर ठेवून या शाळेतील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक अरुण पाटील यांनी जिल्हा व राज्यातील  अनेक संकेत स्थळांना भेटी देऊन अनेक ई-पुस्तकांचा संग्रह केला व शाळेत ही लायब्ररी  सुरू केली. ई-लायब्ररी शिक्षणात  तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने हे महत्त्वाचे पाऊल आहे.बहिणाई  ई-लायब्ररीखान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव या  ई-लायब्ररीला देण्यात आले आहे. या  ई-लायब्ररीत पीडीएफ व ‘ऑडिओ’ स्वरुपातील  ई पुस्तके  आहेत. विद्याथ्र्यांच्या सोयीसाठी बोधकथा, ऐतिहासिक पुस्तके, कथा कादंब:या, इंग्रजी साहित्य, मराठी-इंग्रजी व्याकरण, काव्यसंग्रह, नेत्यांची-शास्त्रज्ञांची माहिती, स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत, स्पर्धा परीक्षा, शिक्षक मार्गदर्शिका, ज्ञान रचनावादी साहित्य, पहिली ते आठवीपयर्ंतची क्रमिक पाठय़पुस्तके, राज्यातील गड-किल्ले, दासबोध ग्रंथ, ज्ञानेश्वरी असे विविध ‘फोल्डर’ समाविष्ट केले आहे. दैनंदिन अभ्यासक्रमाची पाठय़पुस्तके समाविष्ट केल्यामुळे विद्याथ्र्यांच्या दप्तराचे ओङो कमी झाले आहे.पालकांसाठीही उपयुक्तबहीणाई  ई-लायब्ररी ही केवळ विद्याथ्र्यासाठीच नव्हे तर पालकांसाठीदेखील अवांतर वाचनाचा छंद  जोपासण्यासाठी  उपयुक्त आहे. ही लायब्ररी शाळेत परिसरात, घरी व कुठेही वाचक व विद्यार्थी आपल्या सोबत मोबाईलमध्ये घेवून जाऊ शकतो.  ई पुस्तके डाऊनलोडसाठी अत्यल्प डाटा लागतो. डाऊनलोड केलेले ई पुस्तक वाचक सोशल मीडियाद्वारे इतरांना पाठवू शकतात.  शाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये  ई-लायब्ररी उघडून घरीदेखील वाचन करू शकतात.  आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मधल्या सुटीत शाळेतील विद्यार्थी प्रोजेक्टवर एकाच वेळेस सर्व विद्यार्थी  वाचन करु शकतात.  विद्याथ्र्याच्या शब्दसंग्रहात झाली वाढपरिपाठात ऑडिओ पुस्तकांचे श्रवण करतात.  या  ई-लायब्ररी मुळे  विद्याथ्र्यांचा शब्दसंग्रहात वाढ झाली असून  विद्याथ्र्यांना प्राथमिक स्वरुपात संभाषण, कौशल्य वाढविण्यास मदत होते. सोबतच या लायब्ररीमुळे विद्याथ्र्यांना वाचनाची आवड तर निर्माण झालीच आहे,  तंत्रज्ञानाचे संस्कारही त्यांच्यावर होत आहे.   ई-लायब्ररीत एकाच क्लिकवर एकाच वेळी अनेक पुस्तके उपलब्ध होतात.आयएसओ शाळाबाळद जि.प. शाळेला 2016  मध्ये आयएसओ नामांकन मिळाला आहे.  शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापक समिती सदस्य नेहमीच लोकसहभागातून विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबतात.  लोकसहभागातून  पहिली व दुसरीचा वर्ग डिजिटल असून भविष्यात सर्व वर्ग डिजिटल करण्याचा मानस आहे.  शाळेचा ब्लॉग तयार केला असून त्यावर शैक्षणिक तसेच  ई-लायब्ररीचा समावेश आहे. यासाठी  प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, गटशिक्षणाधिकारी जितेंद्र महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड,  केंद्र प्रमुख दिलीप शिरसाठ, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना फळ्यावर शिकवण्यापेक्षा डिजिटल स्क्रीनवर शिकणे फार आवडते. विद्याथ्र्यांना, पालकांना महागडी पुस्तके घेणे परवडत नाही. यासाठी मी   ई-लायब्ररीची निर्मिती केली.  बाजारातून  आणलेली पुस्तके ही कालांतराने जीर्ण होतात. मुलांना प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यापेक्षा डिजिटल स्क्रीन व वडिलांना मोबाईलवर पुस्तकाचे वाचन  करायला  खूप आनंददायी वाटते व त्यांच्या  दीर्घकाळ स्मरणात राहते. ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी ही डिजिटल क्रांतीच आहे.- अरुण एस.पाटील,  ई-लायब्ररीचे तंत्रस्नेही