शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 15 पैकी 9 पं.स.मध्ये ‘महिला राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 00:26 IST

आरक्षण सोडत : अडीच वर्षासाठी संधी मिळणार

जळगाव : आगामी काळात होत असलेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर निवडल्या जाणा:या सभापतीपदासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली.               12 ठिकाणी चक्रानुक्रमानुसार, तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या दोन व सर्वसाधारण महिला या तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील 15 पैकी 9 पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापतीपद 13 मार्च 2017 पासून पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, ग्रामपंचायत शाखेचे नायब तहसीलदार सुभाष सोनवणे उपस्थित होते.सुरुवातीला जिल्हाधिका:यांनी 15 पंचायत समित्यांमध्ये असलेले सद्य:स्थितीचे आरक्षण आणि चक्रानुक्रमे आरक्षणाची पद्धत समजावून सांगितली. शासनाने पंचायत समितीनुसार निश्चित केलेल्या आरक्षित जागांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. सुरुवातीला अनुसूचित जाती व जमाती या जागांच्या पदासाठी एकूण लोकसंख्येची टक्केवारी उतरत्या क्रमाने लावून आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सन 1995 ते 2017 या दरम्यान चक्रानुक्रमानुसार आरक्षणाची माहिती घेण्यात येऊन आज नवीन आरक्षण घोषित करण्यात आले. ही प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग या दोन सभापतीपदासाठी, तर सर्वसाधारण महिला या एका पदासाठी अशा तीन जागांसाठी सोडत काढण्यात आली.9 पंचायत समित्यांमध्ये                महिला राजशुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर 9 पंचायत समित्यांमध्ये महिला राज राहणार आहे.  त्यात जळगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर, धरणगाव, यावल, रावेर, पारोळा, चाळीसगाव या  पंचायत समित्यांचा समावेश आहे. त्यात अनुसूचित जाती महिला 1, अनुसूचित जमाती 1, अनुसूचित जमाती महिला 2,  नागरिकांचा मागास प्रवर्ग 2, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 2, सर्वसाधारण 3, सर्वसाधारण महिला 4 अशा जागा आहेत.