शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

५४ वकीलांची ८१ ब विरोधातील याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:44 IST

गाळेधारकांना धक्का

ठळक मुद्दे सात महिन्यांपुर्वी उपायुक्तांनी दिले होते आदेश

जळगाव - महानगरपालिकेच्या मालकीच्या छत्रपती शाहु महाराज मार्केटमधील वकील चेंबरमधील ५४ वकीलांनी मनपाच्या ८१ ब विरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे वकील चेंबरमधील ६१ गाळे जप्त करण्याचा मनपाचा मार्ग मोकळा झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे ताब्यात घेण्याचे आदेश जून २०१७ मध्ये दिले आहेत. त्यानुसार सात महिन्यांपुर्वी मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी छत्रपती शाहु महाराज मार्केटमधील ६१ गाळ्यांबाबत ५४ वकीलांना ८१ ब ची नोटीस बजावून, हे गाळे खाली करण्याचे आदेश दिले होते. ही नोटीस रद्द करण्याबाबत ५४ वकीलांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शनिवारी सायंकाळी न्यायमुर्ती गोविंद सानप यांच्या न्यायालयात अंतीम युक्तीवाद झाला. न्यायाधिशांनी याचिकाकर्ता व मनपाची बाजू ऐकून घेतली. ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमुर्ती सानप यांनी वकीलांची याचिका फेटाळली असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी दिली. ५४ वकीलांची बाजू अ‍ॅड.डी.एच.परांजपे व अ‍ॅड.के.बी.वर्मा यांनी मांडली. तर मनपाची बाजू अ‍ॅड.केतन ढाके यांनी मांडली.