शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचा संंशय ठरला खरा, भुसावळ तालुक्यात दीडशे शेतकऱ्यांची नावे झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 15:46 IST

कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे.

ठळक मुद्देव्यापाºयांचा हिरमोडअवघ्या १५ दिवसात सुमारे ४० हजार क्विंटल कापूस खरेदीचे आव्हान

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ५७९ शेतकºयांचा १९ हजार ७१० क्विंटल कापूस खरेदीस पात्र ठरला आहे. हा कापूस केवळ तालुक्यातील २५ गावातील शेतकºयांचा आहे. जामनेर व यावल येथील पन्नास गावांची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. मात्र त्या गावातील किती शेतकरी व किती क्विंटल कापूस यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे किमान ४० हजार क्विंटल कापूस मोजण्याचे आव्हान सीसीआय कापूस खरेदी केंद्रला आहे.२३ मे रोजी दिले पंचनाम्याचे आदेशकापूस विक्रीसाठी सर्वच सीसीआय कापूस खरेदी केंद्रांवर गर्दी झाली. २२ मे पर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३९१ कापूस उत्पादक शेतकºयांच्या घरात कापूस असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंद झालेल्या याद्यांवरून दिसून आले. यातील केवळ चार हजार ८९३ शेतकºयांचा कापूस विक्री झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ४३ हजार ४९८ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस घरात पडून असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या लक्षात आले. शेतकºयांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे व कसा? याचा अंदाज बांधता यावा यासाठी २३ मे रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांना तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून पंचनामे करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. पंचनामा केल्यानंतर त्या याद्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे द्याव्या. सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना याद्या देऊन कापूस खरेदीच्या सूचना कराव्या, असे आदेशात नमूद करण्यात आले होते.तहसील कार्यालचा पुन्हा बाजार समितीवरच विश्वासतालुक्यात कृ.उ.बा. समितीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना दिलेल्या २५ गावातील ७२९ शेतकºयांच्या याद्यांचे पंचनामे अवघ्या दोन दिवसात पूर्ण करण्यात आले व ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे पंचनाम्यानंंतर दिसून आले. याद्यांमध्ये व्यापाºयांंनी त्यांच्या सोयीसाठी टाकलेली तब्बल १५० शेतकºयांची नावे कमी करून तलाठी, ग्रामसेवक व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी त्या याद्या तहसील कार्यालयाला सादर केल्या. तहसील कार्यालयाने या याद्या स्वत: तयार न करता पुन्हा कृ.उ.बा.कडे दिल्या. जिल्हाधिकाºयांनी अप्रत्यक्ष अविश्वास व्यक्त केल्यामुळे तालुक्यात १५० शेतकरी अतिरिक्त ठरले. तरीही तहसील कार्यालयाने याद्या अद्ययावत करण्यासाठी कृ.उ.बा.कडे देण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला. कृ.उ.बा.ने दोन दिवस या याद्या हाताळल्या. त्यामुळे पुन्हा संशय व्यक्त करण्यात येत आहे.महिनाभरात केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी, ५० हजार क्विंटल कधी मोजणार?दरम्यान , जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून कुºहे (पानाचे) येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ३ मे पासून पुन्हा खरेदी सुरू झाली आहे. मात्र कधी जागेची अडचण, कधी मशनरी नादुरुस्त, तर कधी शेतकºयांशी वाद यामुळे २५ दिवसांमध्ये पाच ते सहा दिवस कापूस खरेदी बंद होती. त्यात ईद व रविवारच्या सुट्ट्या वेगळ्याच. त्यामुळे महिनाभराच्या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस खरेदी केंद्र १५ जून पासून बंद होणार असल्याचे वृत्त आहे. सुरू राहिले तरी १५ दिवसानंतर पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ दिवसांमध्ये तालुक्यातील २५ गावातील ५७९ शेतकºयांचा १९ हजार ६०० क्विंटल कापूस व खरेदी केंद्रावर यावल तालुक्यातील २५ व जामनेर तालुक्यातील २४ अशा दोन तालुक्यातील किमान ५० गावातील एक हजार शेतकºयांचा ४० हजार क्विंटल कापूस असू शकतो.अवघ्या पंधरा दिवसात ते हे आव्हान कसे पेलणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.याद्या कृ.उ.बा.कडूनतहसीलदार दीपक देवरे यांच्याशी संपर्क केला असता मोबाईलवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कृ.उ.बा. समितीमध्ये शेतकºयांच्या याद्यांचा डाटा असल्यामुळे त्यांच्याकडून याद्या तयार करून घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. मात्र या याद्यांमध्ये घोळ नसल्याचा दावा तहसील कार्यालयातून करण्यात आला आहे.

टॅग्स :cottonकापूसBhusawalभुसावळ