शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना शोध मोहिमेची मुहूर्तमेढ रोवलीय खानापूरच्या आरोग्यसेवकांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:08 IST

वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी खानापूर गावातील १४ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल आठ रुग्णांचा स्क्रिनिंगमधून शोध घेतल्याची बाब त्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली आहे.

ठळक मुद्देकोरोना बाधित आढळून आलेल्या सहा रूग्णांखेरीज आठ रुग्णांचा स्क्रिनिंंगमधून घेतला शोधआरोग्य शोधमोहिमेत यश

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर पाहता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या बदलीनंतर नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘ट्रेस, टेस्ट व ट्रिट’ अशी ‘ट्रिपल-टी’च्या कोरोनारुग्ण शोधमोहीम अभियान राबविण्याची घोषणा केली आहे. तथापि, वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी खानापूर गावातील १४ कोरोना बाधित रुग्णांपैकी तब्बल आठ रुग्णांचा स्क्रिनिंगमधून शोध घेतल्याची बाब त्या अभियानाची मुहूर्तमेढ रोवणारी ठरली आहे.कोरोना विषाणूचे अनलॉकमुळे होत असलेल्या वाढत्या संक्रमणात स्वत:च्या अंगावरची कातडी अर्थात जीव वाचवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांंमध्ये बहुतांशपणे नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणात जाणवते. किंबहुना, जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग गुदरलाच तर काहींची समर्पणाची भावना असते. तेही फार तोकडे प्रमाणात असतात, तर काही जण पानावर पान ठेवून पाट्या टाकण्याचे काम करीत जबाबदारी पार पाडणारे असतात.तालुक्यातील खानापूर गावात अशा दोन्ही वृत्तीची मनोभावना ग्रा पं प्रशासकीय व आरोग्य कर्मचाºयांमध्ये आढळली. खानापूर गावात रावेर शहरातील जिजाऊ नगरातील मयत विधवा कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील महिला व तिची दोन वर्षे वयाची नात कोरोना बाधित असल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तद्नंतर, उभय गावातील कुंडी परिसरातील दोन्ही आई व मुलाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. असे सहा रुग्ण कोरोना बाधित झाले. त्याठिकाणी प्रतिबंधित क्षेत्राची निर्मिती करणे, प्रतिबंधित क्षेत्र सुरक्षित ठेवणे व स्वयंसेवक नियुक्त करून जीवनावश्यक वस्तू पुरवणे या बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचे प्रकर्षाने जाणवले.तर दुसरीकडे मात्र वाघोड प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदावर चार वर्षांपासून सेवारत असलेले आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी मात्र या दोन्ही प्रतिबंधित क्षेत्रासह बफर झोनमध्ये घराघरात इन्फ्रारेड थर्मामीटर व आॅक्सी पल्समीटरद्वारे धडक स्क्रिनिंगची शोधमोहीम राबवली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील व नोडल आॅफिसर डॉ.एन.डी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक दिनेश सांडू चौधरी यांनी आशावर्कर आरती शेलोडे, अनिता बुंदेले, वंदना तायडे, रंजना धनगर अंगणवाडी सेविका कुंदा धांडे, सुनीता धांडे, आशा तायडे, काजल धांडे व ग्रा.पं.शिपाई किरण सोनवणे यांच्या पथकाच्या अथक परिश्रमातून चार प्रतिबंधित क्षेत्रात सतत तीन चार-दिवस संशयित रूग्णांच्या शरीरातील आॅक्सिजनचे सरासरी प्रमाण ९५ टक्केच्या खाली आढळलेल्या वाघ वाड्यातून एकापाठोपाठ एक पुरूष, एक युवक व तीन महिला तर सप्तशृृंगीनगरातील एक सलून व्यावसायिक अशा सहा जणांना रावेर कोविड केअर सेंटरला पाठवले. दरम्यान, माळीवाड्यातील एका आजारी रुग्णासह त्यांच्या पत्नीलाही स्क्रिनिंग करून शोधमोहिमेत पाठवले होते. त्यात या आठही जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी प्रामाणिक व समर्पित भावनेने हाती घेतलेल्या अभियानात यश प्राप्त केले आहे.ग्रा.पं.प्रशासनाकडून त्यांना स्क्रिनिंंग झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या हातावर टाकण्यासाठी सॅनिटायजरचे द्रव वा शोधमोहिमेतील आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित मास्क दिले नसताना प्रत्येक नागरिकाला तपासणीनंतर साबण लावून हात धुण्याचा व खासगी वापरातील सॅनिटायजरचा वापर करण्याचा सल्ला देवून खडतर प्रयत्नांनी त्यांनी आपली ही यशस्वी मोहीम सुरूच ठेवली आहे. परवाच त्यांनी उभय गावातील शाळेच्या शिपाई असलेल्या एका पुरुषाचे आॅक्सीपल्स कमी आल्याने त्यांना संशयित रुग्ण म्हणून रावेर कोविड केअर सेंटरला दाखल केले आहे.अर्थात नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेनुसार आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्रासह बफर झोनमध्ये स्क्रिनींग व कॉण्टॅक्ट ट्रेसिंग करतांना कोविड केअर सेंटरला पाठवलेल्या ३० जणांपैकी चार कोरोना बाधित रूग्ण हे कॉण्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये तर चार रूग्ण हे स्क्रिनिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हाधिकारी राऊत यांच्या ट्रिपल टी या शोधमोहिमेची आरोग्य सेवक दिनेश चौधरी यांनी त्यांच्या आशावर्कर व अंगणवाडी पथकासोबत अथक परिश्रम घेत खºया अर्थाने मुहूर्तमेढ रोवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर